मुंबईत 11 जागांवर सेना विरुद्ध सेना:सहा जागांवर उद्धवसेना, 5 जागांवर शिंदेसेनेचे आमदार विजयी

2 hours ago 1
मुंबईत कोणत्या शिवसेनेचे वर्चस्व आहे, या प्रश्नाचे उत्तर शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालातून मिळाले. कारण मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी ११ जागांवर एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आमने-सामने लढाई झाली. यात ठाकरे गटाने एकूण सहा जागा जिंकल्या. त्यात शिवसेनेकडून २०१९ च्या निवडणुकीत ३ जागांवर विजयी झालेल्या आमदाराने उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात प्रवेश केला होता. त्यामुळेच या जागांवर उद्धव ठाकरे गटाचा विजय महत्त्वाचा मानला जातो. ठाकरेंविरोधात बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले रवींद्र वायकर लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी जोगेश्वरी-पूर्व मतदारसंघातून पत्नी मनीषा यांना उभे केले होते. उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक अनंत नर यांनी त्यांचा १५४१ मतांनी पराभव केला. नर यांना एकूण ७७०४४ तर खासदार वायकर यांच्या पत्नीला ७५५०३ मते मिळाली. भायखळा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार मनोज जामसुतकर यांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला आहे. यामिनी जाधव यांचा हा सलग दुसरा मोठा पराभव आहे. यापूर्वी लोकसभेतही त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर यांना एकूण ८०१३३ तर यामिनी जाधव यांना ४८७७२ मते मिळाली. ठाकरे गटाने शिंदेंच्या उमेदवाराचा ३१३६१ मतांनी पराभव केला आहे. अशाप्रकारे शिंदेचे तीन विद्यमान ठाकरे गटाच्या उमेदवाराकडून पराभूत झाले. ठाकरेंचे दोन आमदार पराभूत ११ जागांवर उद्धवसेनेशी थेट लढतीत शिंदेसेनेने ५ जिंकल्या आहेत. ठाकरे गटाच्या दोन आमदारांनी त्यांनी पराभूत केले. भांडुप-पश्चिममधून रमेश कोरगावकर आणि चेंबूरमधून प्रकाश फातर्पेकर हे शिवसेनेकडून विजयी झाले. हे दोन्ही आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे प्रकाश फाटर्पेकर यांचा शिंदे गटातील तुकाराम काटे यांनी पराभव केला आहे. भांडुप-पश्चिममध्ये रमेश कोरगावकर यांचा शिंदेंच्या अशोक पाटील यांच्याकडून ६,७६४ मतांनी पराभव झाला. मागाठाणेत शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे ५८ हजार मतांनी, अंधेरी-पूर्व मतदारसंघातून मुरजी पटेल (काका) २५,४८६ मतांनी आणि कुर्ला मतदारसंघातून मंगेश कुडाळकर यांनी ४१८७ मतांच्या फरकाने विजय मिळवला. २०१९ मध्ये सुर्वे आणि कुडाळकर हे शिवसेनेचे आमदार होते. यावेळी ते शिंदे गटातून विजयी झाले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article