मृत्यूनंतरही आपल्या चांगल्या कामाची किर्ती मागे उरावी:घरनिकीत बोरसे महाराज यांचे प्रतिपादन
6 hours ago
1
याच साठीकेला होता अट्टाहास! शेवटचा दिवस गोड व्हावा!!आता निशिंतीले पावलो विसावा! खुंटलिया धावा कृष्णेचीया!! या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा सार घेत माणसाला जीवनाचा उध्दार करता आला पाहिजे, मरावे परी कीर्ती रुपी उरावे अशी कीर्ती करा की, आपला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, असे विचार गोपाळपूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. बाबूलाल बोरसे महाराज यांनी मांडले. स्वर्गीयसुब्राव भुजंगराव पवार व स्वर्गीय सौ मुक्ताबाई सुब्राव पवारयांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त घरनिकी येथे गुरुवारी आयोजित कीर्तनात ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे, श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, मारापुरचे सरपंच विनायक यादव , सिद्धेवाडी चे सरपंच बाबा जाधव, दिलीप सावंत यांनी पुष्पहार अर्पण केला, कीर्तनानंतर दुपारी १२.३० पुष्पवृष्टी करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पुढे बोलताना बोरसे महाराज म्हणाले, मला परमगती प्राप्त व्हावी ,भगवंताच्या निजधामाला अखंड राहावे यासाठी नामस्मरण आवश्यक आहे.असे त्यांनी सांगितले. या कीर्तनाच्या वेळी बोरसे महाराज यांना पवन महाराज ,विठ्ठल महाराज पाटील ,हनुमंत पाटील गुरुजी ,कल्याण देवडेकर ,भास्कर मळगे यांच्यासह हनुमान भजनी मंडळ घरनिकि यांनी साथ दिली. यावेळी घरनिकी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कीर्तन ऐकण्यास उपस्थित होता.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)