शिर्डी आज दुहेरी हत्याकांडाने हादरली. या विषयावर बोलताना भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय. त्यामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढतेय’ असं म्हटलं. “अत्यंत दुर्देवी घटना पहाटे चार वाजता घडली. अशा प्रकारे चाकूने वार करण्यात आले. खरतर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही. ही अचानक झालेली एक निर्घृण हत्या आहे. चार-पाचच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते. हा निरोप येता-येता सहा-सात वाजले. दोन मृतदेह वेगवेगळ्या स्पॉटवर आढळले. आता प्रवरा मेडिकलमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु आहेत, तो धोक्यातून बाहेर यावा ही अपेक्षा. अजून मी डॉक्टरशी बोललेलो नाही” असं सुजय विखे पाटील म्हणाले.
“मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय. त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. आम्ही जे बोललो होतो, ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो, ते महाराष्ट्रला कळेल. हे प्लान मर्डर वाटत नाहीत, नशेमध्ये होत असलेले रँडम मर्डर आहेत” असं सुजय विखे पाटील म्हणाले. ‘आज त्यावर राजकारण नको. जे घडलं ते दुर्दवी आहे’ असं त्यांनी सांगितलं.
‘यात जाती-पातीचा विषय नाही’
“व्हाईटनर जे नशा करतात ती ही मुलं असावित. वेगवेगळ्या लोकेशनला जो सापडला, त्याच्यावर हल्ला करून त्याच्याकडून पैसे काढण्याच हे कृत्य आहे. यात जाती-पातीचा विषय नाही. हे नशेखोरांचं कृत्य आहे, दुपारपर्यंत हे आरोपी ताब्यात असतील” असं सुजय विखे पाटील म्हणाले. “साडेपाचला पोलिस कर्मचा-याला फोन केला, त्या कर्माचा-याने तो अपघात सांगितला. त्याला सस्पेंड केलं जाईल. त्याला मर्डर आणि अपघातातला फरक कळत नाही त्याला पोलीस स्टेशनमध्ये राहणायाच अधिकार नाही” असं सुजय विखे पाटील म्हणाले.
कोण-कोणावर हल्ला
शिर्डीत आज पहाटेच्या सुमारास सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ हे साई संस्थानमध्ये निघाले होते. त्यावेळी आरोपीने वाटेत अडवून त्यांची निर्घृण हत्या केली. कृष्णा देहरकर हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात हल्ला झाला..