जर तुमच्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये वारंवार साप निघत असतील तर त्यामुळे सर्पदंशाचा धोका देखील वाढतो, जर तुम्हाला साप आढळून आला तर त्याची माहिती तुमच्या परिसरातील सर्पमित्राला देणं आवश्यक आहे.
साप म्हटलं की आपल्या अंगावर भीतीनं काटा उभा राहातो. जर आपल्या घरात किंवा परिसरात वारंवार साप निघत असतील तर त्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात.
1 / 7
भारतात सापाच्या हजारो प्रजाती आढळतात मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच जाती या विषारी आहेत. ज्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा असं देखील म्हणतो या चार प्रमुख विषारी जाती आहेत.
2 / 7
जर तुमच्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये वारंवार साप निघत असतील तर त्यामुळे सर्पदंशाचा धोका देखील वाढतो, जर तुम्हाला साप आढळून आला तर त्याची माहिती तुमच्या परिसरातील सर्पमित्राला देणं आवश्यक आहे.
3 / 7
सापाचं प्रमुख खाद्य म्हणजे उंदिर, बेडूक आणि इतर छोटे-मोठे पक्षी हे असतं. जर तुमच्या घराच्या परिसरात अस्वच्छता असेल. खरकट अन्न उघड्यावर फेकलं जात असेल तर ते खाण्यासाठी उंदीर येतात, आणि तिथे बिळं देखील करतात. अशा ठिकाणी सापाला निवाऱ्याची देखील सोय होते, तसेच अन्न देखील मिळते.
4 / 7
त्यामुळे नेहमी परिसरात स्वच्छता ठेवावी, घरात उंदीर होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आसपास कुठे बीळ असेल तर जे बुजून टाकावेत. दरम्यान अशा देखील काही वनस्पती आहेत, ज्यामुळे साप तुमच्या घरात येऊ शकतो, आज त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
5 / 7
बांबू - बांबू ही अशी वनस्पती आहे, ज्यामुळे तेथील जमीन नेहमी भुसभुशीत राहाते. पाल पाचोळा मोठ्या प्रमाणात पडल्यानं अडचण निर्माण होते. उंदीर देखील तीथे असतात. त्यामुळे अशा ठिकाणी सापाचा वावर असतो. बांबूचं झाड उंच वाढतं, तीथे पक्षी घरटी बनवतात त्यातील अंडी खाण्यासाठी सुद्धा साप या झाडावर येतात.
6 / 7
बांबू प्रमाणेच लिंबुनीचं झाडं आणि चंदनाचं झाडं देखील सापांना आपल्याकडे आकर्षीत करते. शितलता हा चंदनाचा गुणधर्म आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उष्णता वाढल्यानंतर साप अनेकदा चंदनाच्या झाडाचा आश्रय घेतात. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
7 / 7