राज ठाकरे अन् माझी राजकीय चर्चा नाही: एकनाथ शिंदेFile Photo
Published on
:
01 Feb 2025, 2:01 am
Updated on
:
01 Feb 2025, 2:01 am
पुणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माझी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकरांशी बोलताना मांडले. पुण्यात शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुकुंदनगर येथे थिएटर अॅकॅडमी या इमारतीचे भूमीपूजन पार पडले.
यावेळी शिंदे यांना पत्रकारांनी विविध विषयांवर प्रश्न विचारले. राज ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा झाली का, असे विचारले असतान ते म्हणाले, आम्ही दोघांनी जे काम केले, त्याची पाहणी केली आहे. राजकीय विषय नाही. भूमिपूजन झाले आहे. आम्हाला जनतेची नाळ महत्त्वाची आहे.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर दोघेही पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यापूर्वी राज ठाकरेंनी स्वत: गाडी चालवली. यावेळी पुण्यात गाडी चालवताना कसे वाटते, असे पत्रकारांनी विचारल्यावर राज ठाकरेंनी फक्त स्मित हास्य केले. तसेच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी ई-व्हेईकलमधून प्रवास केला.
रवींद्र धंगेकरांनी घेतली शिंदेंची भेट
शहरातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच धंगेकर हे शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी जोरदार चर्चा आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असते ते म्हणाले, मला कोणीही भेटू शकते.