विरोधकांकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
क्षीरसागर म्हणाले, आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो, मी आयुष्यात कधी चुकलो नाही आणि चुकणारही नाही. विरोधक अफवा पसरवत आहेत. जनतेत संभ—म निर्माण करत आहेत. माझ्या प्रचार सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांना धडकी भरली आहे. येत्या काळात शहरातील शंभर टक्के रस्ते सिमेंटचे करण्याचे नियोजन आहे. तसेच कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ, अंबाबाई तीर्थक्षेत्र, शहराची हद्दवाढ, आयटी पार्क, भव्य फुटबॉल संकुल ही माझ्यासमोर महत्त्वाची कामे आहेत. यावेळी ऋतुराज क्षीरसागर, बाळासाहेब काळे, आनंदराव माजगावकर, विश्वनाथ सांगावकर, भरत काळे, शिवाजी गवळी, बबन गवळी, संदीप ढणाल, अभिजित गजगेश्वर, सचिन ढणाल, प्रकाश भालकर, अक्षय कुंभार, अरविंद दुर्गुळे, पप्पू रजपूत, आशिष पाडळकर, प्रकाश भोसले, नीलेश हंकारे, अवधूत कलकुटकी, राहुल खुपेरकर, सचिन भोळे, नितीन ब—ह्मपुरे, सुमित ब—ह्मपुरे उपस्थित होते.