या कारवाईत पथकाला येथून विविध कंपन्याचे 150 सिम कार्ड, 30 विविध बँकांची खाती व चेकबुक, 15 मोबाईल, 29 डाटा रजिस्टर, 12 एटीएम कार्ड, 05 पॅन कार्ड, 02 संगणक, 35 विविध कंपन्यांच्या नावांचे बनावट शिक्के मिळून आले.
या प्रकरणात पोलिसांनी पोखरकर सिद्दिकी आणि मानकर यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील एक जण यापूर्वी एलआयसी पॉलिसी काढून देण्याचे काम करत होता. त्यातून त्याने एलआयसीचा ग्राहकांचा डेटा मिळविला.
त्यावरून नागरिकांना संपर्क केला जात होता. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, अंमलदार नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख, सरस्वती कांगणे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.