विद्यार्थ्यास आत्महत्येस केले प्रवृत्त:तिघांवर गुन्हा दाखल, मुलींसोबतचे संबंध इतरांना सांगितल्याने दिल्या होत्या धमक्या
2 hours ago
2
हिंगोली शहरातील एका क्लासेसमधील मुलीसोबत असलेले संबंध इतर मुलांना का सांगितले, या कारणावरून क्लासेसच्या शिक्षकासह तिघांनी दिलेल्या धमक्यामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून हिंगोली शहर पोलिसांनी तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून 15 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा येथील इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थी किरण लोंढे हा हिंगोली येथील एका क्लासेसमध्ये शिकवणी वर्गासाठी येत होता. 13 नोव्हेंबर रोजी तो शिकवणी वर्गासाठी आला, त्यानंतर त्याने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी आढळून आली. क्लासेसमधील शिक्षक अनिल वानखेडे (रा लाख ता औढा), ज्ञानेश्वर गिरी (रा म्हाळजगाव ता औंढा) सतीश थोरात (रा गढाळा ता औढा) यांच्या फसवणुकीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आज गजानन लोंढे यांनी रात्री उशिरा हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये अनिल वानखेडे, सतीश थोरात, ज्ञानेश्वर गिरी यांनी क्लासमधील मुलींसोबत आमचे संबंध असल्याचे इतर विद्यार्थ्यांना का सांगितले, तसेच आमची व मुलीची बदनामी का केली, या कारणावरून किरण यास धमकी दिली जात होती. वरील तिघांकडून वारंवार दिल्या जाणारा मानसिक त्रास व धमक्यांना कंटाळून किरण यांनी आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यावरून हिंगोली शहर पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत जाधव, जमादार गणाजी पोटे, संजय मार्के, धनंजय क्षीरसागर, अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी तीनही आरोपींचा शोध सुरू केला असून त्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)