विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर आलेल्या निकालांवर महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदारांचा अजिबात विश्वास बसलेला नाही. महाविकास आघाडीला राज्यात अनुकूल वातावरण असतानाही महायुतीची सत्ता आली. ईव्हीएममधील काहीतरी गडबडीमुळे विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल आल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे आणि आता प्रत्यक्ष झालेले मतदान आणि ईव्हीएमधून बाहेर आलेल्या मतांमध्ये 95 मतदारसंघांत तफावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या विरोधात जसे वातावरण होते तसेच वातावरण विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या विरोधात होते. पण तरीही महायुतीला मोठे यश मिळाले. या निकालावर राज्यातील सर्वसामान्य मतदारांचा अजितबात विश्वास नाही. ईव्हीएममधील घोटाळ्यामुळे महायुती सरकार राज्यात सत्तेवर आले, अशी शंका मतदार घेत आहे. राज्यातील मतदान आणि ईव्हीएममधील मते यांच्यावर नजर टाकली तर मतदारांशी घेतलेल्या संशयावर जवळजवळ शिक्कामोर्तब होते. कारण प्रत्यक्ष झालेले मतदान आणि ईव्हीएममधून बाहेर आलेला आकडे यामधील तफावत स्पष्टपणे दिसत आहे.
राज्यातील 288 मतदारसंघापैकी 95 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये झालेले मतदान आणि 23 उमेदवारला ईव्हीएम मशिनमधून प्रत्यक्ष बाहेर पडलेले मतदान यामध्ये प्रचंड फरक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
मतदान आणि मतजोणीतील फरक
95 विधानसभा मतदारसंघात तफावत
19 मतदारसंघात ईव्हीएमध्ये आढळली जास्त मते
76 मतदारसंघात आढळली कमी मते
बूथ पातळीवरील फाँर्म 20मध्ये तपासणीत फरक. त्यामुळे या मतदारसंघाची संख्या वाढू शकते असे सांगण्यात येते
193 मतदारसंघात फरक नाही म्हणजे मतदान आणि मतमोजणीत एकसमान मते. ईव्हीएमधील आकडेवारीत फरक नाही.
या विधानसभा मतदारसंघात कमी मते
अक्कलकुवा, नवापूर, साक्री, शिरपूर, चोपडा, भुसावळ, जळगाव शहर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, अकोट, अकोला पश्चिम, मोर्शी, वर्धा, सावनेर, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, वणी, नांदेड दक्षिण, मुखेड, कळमनुरी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, घनसावंगी, बदनापूर, संभाजीनगर(पश्चिम), गाणगापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, बागलाण, सिन्नर, निफाड, नालासोपारा, वसई, भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मीरा भाईंदर, ओवळा माजीवाडा, कोपरी पाचपाखाडी, दिंडोशी, चारकोप, विलेपार्ले, चांदीवली, सायन कोळीवाडा, मुंबादेवी, पनवेल, कर्जत, अलिबाग, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, बारामती, मावळ, कोथरूड, खडकवासला, पुणे पॅन्टोन्मेंट, कोपरगाव, शेवगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, आँसा, तुळजापूर, माढा, सोलापूर शहर मध्य, कोल्हापूर उत्तर, खानापूर
या विधानसभा मतदारसंघात जास्त मते
आमगाव, उमरखेड, लोहा, देगलूर, हिंगोली, संभाजीनगर पूर्व, वैजापूर, मालेगाव मध्य, कळवण, चांदवड, दिंडोरी, बोईसर, भोसरी, परळी, करमाळा, सोलापूर (दक्षिण), कागल, कोल्हापूर (दक्षिण), हातकणंगले.
नक्कीच घोटाळा
यासंदर्भात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. अवधान गाव कुणालबाबाला शून्य मतदान दाखवत आहे. जे गाव 70 टक्के त्यांच्या संस्थेत काम करते… कट्टर कार्यकर्ते आहे. आंदोलन करीत आहे ते लोक… नक्कीच घोटाळा असे पोस्टमध्ये नमूद केले आहे.
70 टक्के मते गेली कुठे? गावकरी उतरले रस्त्यावर
धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे कुणाल पाटील निवडणूक रिंगणात होते. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. भाजपचे राघवेंद्र पाटील विजयी झाले. या मतदारसंघातील अवधान गावात कुणाल पाटील यांना एकही मत न मिळाल्याची चर्चा आहे. मतदासंघातील त्यांच्या कार्याचा आवाका लक्षात घेता कुणाल पाटील यांचा पराभव होऊच शकत नाही अशी मतदारांची धारणा आहे. त्यातच त्यांच्याच अवधान गावात त्यांना एकही मत न मिळाल्याच्या चर्चेमुळे गावकरी संतप्त झाले. त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. 70 टक्के गावकऱयांनी काँग्रेसला मतदान केले तरी पाटील यांना एकही मत कसे नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला.