विधानसभेची मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार:कजगाव येथे 71.73 टक्के झाले मतदान
6 hours ago
1
भडगाव तालुक्यातील बाजारपेठेचे गाव कजगाव येथे विधानसभेचे मतदान शांततेत पार पडले. तालुक्यातील मोठे गाव असल्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे कजगाव येथील मतदानाकडे लागले होते. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत संत गतीने मतदान सुरू होते. तीन वाजेनंतर अचानक गर्दी वाढू लागली. व मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या. काहि केंद्रांवर संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. मतदान हे शांततापूर्ण वातावरणात पार पडले. एकूण मतदान हे ७१.७३ टक्के झाले. या मतदानात अनेक ज्येष्ठ व दिव्यांग नागरिक यांनी भाग घेतला. सुरक्षिततेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. यावेळी निवडणूकीसाठी मध्य प्रदेश पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)