व्यक्तिवेध – जागतिक कीर्तीचे मिसाईल मॅन

2 hours ago 1

>> वर्षा चोपडे

प्रत्येकाने काहीतरी प्रेरणा घ्यावी असे करोडोत एक व्यक्तिमत्त्व म्हणजे  भारतरत्न, माजी राष्ट्रपती, उत्कृष्ट लेखक व महान शास्त्रज्ञ ए.पी.जे. अब्दुल कलाम. 15 ऑक्टोबर रोजी त्यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात साजरा होत आहे.

असे म्हणतात, थोर व्यक्तिमत्त्व हे अत्यंत  प्रामाणिक, आत्मनियंत्रित व जगाचे कल्याण व्हावे म्हणून  दिव्यासारखे तेवत असतात. आज आपले लाडके महान शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस. हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्पामांच्या विकासात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले…

भारतरत्न, माजी राष्ट्रपती, उत्कृष्ट लेखक व महान शास्त्रज्ञ अवुल पाकीर जैनुलाब्दिन तथा ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 2002 ते 2007 या काळात भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. 15 ऑक्टोबर रोजी त्यांचा जन्मदिवस संपूर्ण देशात साजरा होत आहे. 1960  मध्ये मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी घेतल्यानंतर कलाम हे संरक्षण संशोधन आणि विकास सेवाचे (अअ)  सदस्य बनले आणि त्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, भारत सरकारद्वारे) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून सामील झाले. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (घ्एRध्) येथे काम केले. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात त्यांना प्रेमाने ‘जनतेचे राष्ट्रपती’ अर्थात ‘पीपल्स प्रेसिडेंट’ म्हणून ओळखले जात असे. असे म्हणतात की, ऑफिस ऑफ प्रॉफिट बिलावर स्वाक्षरी करणे हा त्यांच्या कार्यकाळात घेतलेला सर्वात कठीण निर्णय होता. डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम, तामीळनाडू येथील छोटेसे घर देशाला दान केले. भारतरत्न किती थोर विचारांचा धनी होता याची साक्ष पटते. जे काही कष्टाने मिळवले ते देशाला अर्पण करणारा महान शास्त्रज्ञ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने पहिल्यांदा पाहिला.

त्यांच्याबाबत अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातून  आजची पिढी बराच काही बोध घेऊन वैचारिक पातळी उंचावू शकते. प्रत्यक्षदर्शी सांगतात की, आयआयटी, वाराणसी येथील दीक्षांत समारंभात डॉ. कलाम यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. स्टेजवर पाच खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. मधली एक खुर्ची कलाम यांच्यासाठी आणि इतर खुर्च्या विद्यापीठातील अधिकाऱयांसाठी होत्या. डॉ. कलाम यांच्या लक्षात आले की, त्यांची खुर्ची इतरांपेक्षा मोठी आहे. तेव्हा त्यांनी त्यावर बसण्यास नकार दिला आणि नम्रपणे कुलगुरूंना बसण्यास सांगितले. वेळेचे भान राखून विद्यापीठ प्रशासनाने

डॉ. कलाम यांच्यासाठी त्याच आकाराची दुसरी खुर्ची ताबडतोब उपलब्ध करून दिली. त्यांचे हे नम्र आचरण आणि ठामपणा त्यांच्यापुढे नतमस्तक होण्यास पुरेसा आहे. बुद्धिवान, पण तेवढेच मानवतावादी असल्यामुळे ते युवकांचे आदर्श होते. दुसरी घटना अशी होती की, डॉ. कलाम यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी त्रिवेंद्रम येथील केरळ राजभवनात एका कार्पामाला हजेरी लावली. त्यांच्याकडे असलेल्या अधिकारामुळे कोणत्याही दोन व्यक्तींना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचा त्यांना अधिकार होता. त्यांनी आपल्या दोन मित्रांना आवर्जून बोलावले. त्यापैकी एक होता चर्मकार मित्र आणि दुसरा छोटय़ा हॉटेलचा मालक. हे बघून उपस्थित पाहुण्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. ते आपल्या जवळच्या लोकांना विसरत नसत हेसुद्धा यावरून दिसून येते. देशासाठी राबणाऱया, मेहनत करणाऱया आणि सुस्वभावी असलेल्या प्रत्येक देशवासीयाला आदर मिळायला हवा असे त्यांना वाटायचे. डॉ. कलाम यांचा शिक्षणाच्या परिवर्तनीय शक्तीवर आणि हिंदुस्थानातील तरुणांच्या अफाट क्षमतेवर विश्वास होता. प्रत्येक वेळी आपल्या उमद्या आणि सुसंस्कृत स्वभावाचे दर्शन घडवणारा महान संशोधक तसेच राष्ट्रपती देशाने पाहिला. असे हे आबालवृद्ध… सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्त्व आपल्याला पर्यावरणावर, शिक्षणावर आणि देशावर प्रेम करायला शिकवते. डॉ. कलाम म्हणायचे की, त्यांना त्यांच्या वडिलांकडून प्रामाणिकपणा, आत्मशिस्त, चांगुलपणावर विश्वास या गोष्टी मिळाल्या आणि आईकडून दयाळूपणाचा वारसा मिळाला.

संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार असलेले डॉ. कलाम यांनी देशाचा यशस्वी ‘एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्पाम’ विकसित करण्यासाठी संरक्षण सेवा, शैक्षणिक संस्था आणि प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञांना एकत्र आणले. राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी देशासाठी काम केले. हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र कार्पामाचे प्रणेते

डॉ. अब्दुल कलाम यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ वैज्ञानिक संशोधन आणि संरक्षण तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणासाठी त्यांच्या अतुलनीय आणि मौल्यवान योगदानासाठी प्रदान करण्यात आला. हिंदुस्थानातील सर्वात प्रतिष्ठित शास्त्रज्ञांपैकी एक असल्याने डॉ. कलाम यांना हिंदुस्थान आणि परदेशातील 36 विद्यापीठे आणि संस्थांकडून मानद डॉक्टरेट मिळवण्याचा अनोखा सन्मान मिळाला आहे. युनायटेड किंगडमच्या रॉयल सोसायटीने त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी किंग चार्ल्स दुसरा पदक प्रदान केले आहे. यूकेमधील वोल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ऑफ सायन्सने सन्मानित करताना एक मान्यवर लॉर्ड पॉल म्हणाले होते, डॉ. कलाम यांचे कर्तृत्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रशस्तिपत्र वाचताना याच विद्यापीठाच्या कुलगुरू, प्रोफेसर कॅरोलिन गिप्स म्हणाल्या, डॉ. कलाम यांनी त्यांच्या स्वतच्या शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे आणि त्यांनी इतरांनाही शिक्षित आणि प्रेरित केले आहे.

डॉ. अब्दुल कलाम यांनी  लिहिलेली पुस्तके  हिंदुस्थानी आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी देशभरातील मुलांची भेट घेतली आणि आपल्या भाषणांनी त्यांना प्रोत्साहन दिले. तरुणांसाठी संदेश देताना ते लिहितात तंत्रज्ञान, ज्ञान आणि माझ्या राष्ट्रावरील प्रेमाने सज्ज असलेला हिंदुस्थानचा एक तरुण नागरिक या नात्याने मला जाणवते की, लहान ध्येय हा गुन्हा आहे. त्यामुळे विकसित हिंदुस्थान साध्य करण्यासाठी मी ज्ञानाचा दिवा तेवत ठेवीन अशी जिद्द बाळगा, जर आपण प्रज्वलित मनाने कार्य केले आणि महान ध्येयदृष्टीसाठी घाम गाळला तर चैतन्यशील विकसित हिंदुस्थानच्या जन्माकडे नेणारे परिवर्तन नक्की घडेल. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली प्राणघातक अग्नी, पृथ्वी, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रs राष्ट्रीय शस्त्रागारात जोडली गेली. शिक्षण आणि देशाला सशक्त बनविण्याबाबतचे त्यांचे विचार आणि विचार उत्कृष्ट ठरले. कसलाही अभिमान न बाळगणारे प्रखर देशभक्त डॉ.कलाम यांना सलाम!

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article