शरद पवारांनी युगेंद्रला बळीचा बकरा बनवले:खासदार उदयनराजे भोसले यांची टीका; म्हणाले - त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे अन्यायकारक

3 days ago 2
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार यांना बळीचा बकरा बनवल्याची टीका भाजप खासदार उदयनराज भोसले यांनी केली आहे. शरद पवारांनी ऐन तारुण्याच्या काळात जे केले नाही, त्याची अपेक्षा आता त्यांच्याकडून करणे हे अन्यायकारक आहे, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. उदयनराजे भोसले म्हणाले, बारामती विधानसभा मतदारसंघात पुतण्या युगेंद्र पवार यांनी आपले काका अजित पवार यांना आव्हान दिले आहे. पण तिथे अजित पवारांनी जोरदार काम केले आहे. याऊलट युगेंद्रने परदेशात दिवस काढलेत. त्याने आता तिथेच आपले आयुष्य काढावे. ज्यावेळी काम करण्याची गरज होती, तेव्हा त्यांनी काहीही केले नाही. पवारांनी यावेळी युगेंद्र पवार यांना तिथे बळीचा बकरा म्हणून उभे केले आहे. शरद पवार आता आपल्याशी गद्दारी केल्याचा आरोप करत आहेत. पण त्यांनी त्यांच्या 55-60 वर्षांच्या काळात अनेक घोषणा केल्या. पण त्याची पूर्तता केली नाही. ही सुद्धा एक मोठी गद्दारीच आहे. खरे गद्दार तर विरोधक आहेत गद्दारी कुणी केली असेल तर ती काँग्रेस, पवार व या लोकांनी केली. त्यांनी लोकांच्या भावनांचा खेळ केला. त्यामुळे खरे गद्दार तेच आहेत. शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभावाची भावना होती. लोकांचा राज्यकारभातील सहभाग वाढवण्याचा विचार शिवरायांनी मांडला. पण काँग्रेसच्या सरकारांनी 60 वर्षांत शेतकरी, लष्करी जवान, महिला, तरुण यांच्याविषयी त्यांनी कोणतेही धोरण राबवले नाही. पण मागील 10 वर्षांत मोदींच्या नेतृत्वात देशात चांगले सरकार आले. त्यांनी छत्रपतींच्या विचारांना अभिप्रेत असणाऱ्या घोषणा केल्या व त्या आचरणातही आणल्या, असे उदयनराजे भोसले म्हणाले. पवारांकडून या वयात अपेक्षा करणे अन्यायकारक ते पुढे म्हणाले, विरोधकांच्या तुतारी, मशाल व हाताचा पंजा अशी निवडणूक चिन्हे आहेत. त्यात हाताच्या पंजाचे काय बोलायचे, त्याने आपल्या उमेदीतही काही केले नाही. मशालीवर मशाल हाती घेऊन शोधण्याची वेळ आली आहे. त्यांनीही कोणतेही काम केले नाही. तुतारीच्या पवारांनी केवळ घोषणाबाजी केली. केवळ तुतारी वाजवली. शरद पवारांनी आपल्या ऐन तारुण्यात जे केले नाही ते आता त्यांच्याकडून अपेक्षा करणे अन्यायकारक आहे. दरम्यान, आज राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे. काही किरकोळ घटना वगळल्या तर सर्वत्र शांततेत मतदान पार पडत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article