शहरातून दर्यापूरकडे जाणारे 5 कोटींचे सोने, चांदी पकडले:3 ठिकाणी पकडलेली 3.11 कोटींची रोख चौकशीअंती परत

6 days ago 2
सहा दिवसांपूर्वी तिवसा पोलिसांनी नागपूरहून अमरावतीत येणारे सोने व चांदीचे दागिने पकडले होते. त्यावेळी हे सोने, चांदी ‘सिक्वेल ग्लोबल प्रेशिअस लॉजिस्टिक’ या कुरिअर कंपनीच्या वाहनात होते. दरम्यान गुरुवारी (दि. १४) सायंकाळी नागपुरी गेट चौकात पोलिसांनी त्याच कुरिअर कंपनीचे वाहन पकडले. त्या वाहनात ५ कोटी १७ लाख रुपयांचे सोने व चांदी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. पोलिस त्याबाबत चौकशी करत आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते ६ वाजताच्या दरम्यान पोलिस नागपुरी गेट भागात नाकाबंदी करत होते. त्यावेळी ही व्हॅन शहरातून वलगावच्या दिशेने जात होती. पोलिसांनी ती थांबवून विचारणा केली असता त्यामध्ये पाच कोटी रुपयांचे सोने व १७ लाखांची चांदी असल्याचे समोर आले. हे सोने, चांदी नागपूरहून अमरावती व येथून दर्यापूर, अकोला या ठिकाणी सुवर्णकारांना सोने देण्यासाठी जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले. ‘सिक्वेल ग्लोबल प्रेशिअस लॉजिस्टिक’ कंपनी ही सोने, चांदी व्यापाऱ्यांपर्यंत वाहतूक करण्याचे काम करत असल्याचे तिवसा येथील कारवाईत समोर आले होते. त्यामुळे दोन दिवसानंतर तिवसा येथील सोने, चांदी सोडले होते. त्याचप्रकारे हे सोनेसुद्धा नेमके कशाचे आहे, याची चौकशी पोलिसांकडून सुरू होती. दरम्यान पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले व त्यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी शहरातील साबणपुरा गेट समोर, चौधरी चौक व अन्य एक अशा एकूण तीन ठिकाणी ३ कोटी ११ लाख रुपये रोख पकडली. या तिन्ही रोख वेगवेगळ्या बँकेच्या एटीएमवर जात असल्याचे समोर आले. मात्र ही कॅश व्हॅनमध्ये अतिरिक्त रोख घेऊन‎जात असल्याची माहिती पोलिसांना‎होती. त्यावेळी पोलिसांनी एका‎ठिकाणाहून १७ लाख, दुसऱ्या‎ठिकाणाहून २ कोटी ४४ लाख‎आणि तिसऱ्या ठिकाणाहून ५०‎लाख अशी एकूण ३.११ कोटी‎रुपयांची रोख जप्त केली होती.‎पोलिसांनी कारवाई करून रक्कम‎पकडली व त्यानंतर निवडणूक‎विभाग व आयकर विभागाला‎माहिती दिली. दरम्यान‎पडताळणीअंती सदर रक्कम‎बँकेच्या एटीएमसाठीच जात‎असल्याचे समोर आल्यामुळे ती‎सोडण्यात आल्याचे पीआय‎आसाराम चोरमले यांनी सांगितले‎आहे.‎ सोने पकडले, पडताळणी सुरू ^नागपुरी गेट हद्दीत सोने व चांदी घेऊन जाणारे एक वाहन पकडले आहे. त्यामध्ये पाच कोटी रुपयांचे सोने असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या प्रकरणी आमची पडताळणी सुरू आहे. -सागर पाटील, पोलिस उपायुक्त.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article