शिक्षक नावाला कलंक असलेले तीन गनंग..:रोहित पवार यांची राम शिंदेंसह भाजप नेत्यांवर टीका, सोशल मिडीयावर पोस्ट केला व्हिडिओ
6 days ago
2
शिक्षक पिढी घडवत असतात. पण यातले तीन कथिक प्राध्यापक आणि एक नेता... यांची ही सुसंस्कृत भाषा बघा. या ठगांची ही भाषा ऐकून यांच्या घरच्या आई-बहिणींनाही लाज वाटली असेल, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते प्रा.राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले की, मी जे म्हणतो यांना कर्जत-जामखेडमध्ये गुंडाराज आणायचंय, त्याचाच हा ट्रेलर आहे. पण मला विश्वास आहे यांचा पिक्चर कर्जत-जामखेडची स्वाभिमानी जनता फ्लॉप केल्याशिवाय राहणार नाही, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. रोहित पवारांचे ट्विट काय? रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलंय की, शिक्षक नावाला कलंक असलेले तीन गनंग.. शिक्षक हे पिढी घडवत असतात. पण यातले तीन कथित प्राध्यापक आणि एक नेता.. यांची ही ‘सुसंस्कृत’ भाषा बघा.. या ठगांची ही भाषा ऐकून यांच्या घरच्या आई-बहिणींनाही लाज वाटली असेल. मी जे म्हणतो यांना कर्जत-जामखेडमध्ये गुंडाराज आणायचंय, त्याचाच हा ट्रेलर आहे. पण मला विश्वास आहे यांचा पिक्चर कर्जत-जामखेडची स्वाभिमानी जनता फ्लॉप केल्याशिवाय राहणार नाही. यांची भाषा ऐकवायला मलाही लाज वाटते पण यांची लायकी जगाला कळावी यासाठी नाईलाजाने आणि अत्यंत दुःखद अंतःकरणाने मी हा व्हिडिओ शेअर करतोय, असे रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कर्जत जामखेड येथे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राम शिंदे, चॅलेंज करायचे असेल तर कोणाला पण करा पण पवारांना करू नका, असे रोहित पवार म्हणाले आहेत. ..तर मविआचे 60 टक्के नेते गुवाहटीला रोहित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना सांगितले होते की, काहीही करा रोहित पवारांना मतदारसंघात अडकवून ठेवा, पण त्यांना ते करता आले नाही. पवार साहेबांनी 10 वर्षात काय केले असे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी विचारले होते, लोक 23 तारखेला दाखवून देतील पवार साहेबांनी काय केले ते. तसेच महाविकास आघाडीचे 170 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा विचास त्यांनी व्यक्त केला आहे. माझ्याकडे चुकून गृहमंत्रीपद आले तर महायुतीमधील 60 टक्के नेते गुवाहाटीला जाऊन राहतील. महाविकास आघाडीचा कोणीही गृहमंत्री झाला तरी महायुतीमधील नेत्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे देणार.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)