श्रीरामपूर मतदारसंघात 1400 मतदान अधिकारी:कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण, सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थी कर्मचारी समाधानी‎

6 days ago 2
श्रीरामपूर मतदासंघांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३ व १४ रोजी दोन दिवसांत सुमारे १४०० मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निरीक्षक अरुणकुमार तसेच अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत तसेच सहायक निवडणूक निर्णय अधािकारी मिलिंद वाघ यांनी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षण दिले. श्रीरामपूर शहरातील वैभव असणाऱ्या खा. गोविंदराव आदिक वातानुकूलित सभागृहात दोन दिवस प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासे, राहुरी तालुक्यातील सुमारे १४०० मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अतिशय प्रसन्न वातावरणात प्रशिक्षण झाल्याने प्रशिक्षणार्थी यांनी समाधान व्यक्त केले. प्रशिक्षणार्थींसाठी चहा नाश्त्याचीही सोय करण्यात आली होती. प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पाडताना मतदान यंत्र ही महत्त्वाची बाब असते. भि. रा. खटोड विद्यालयात मतदानासाठी मतदान यंत्र कसे तयार करावे? मॉक पोल कसे घ्यावे? मतदान सुरू करण्यापूर्वी व संपल्यावर मतदान यंत्र सीलबंद कसे करावे ? कागदपत्रे कसे भरावे? काही अडचण कशी सोडवावी याचे प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. निवडणुकीच्या प्रशिक्षणाने मनोबल वाढले श्रीरामपूरमध्ये अतिशय सुंदर नियोजन बघायला मिळाले. आमची स्वागतही चांगले झाले. व्यवस्था चांगली केली गेली. त्यामुळे कोणताही त्रास झाला नाही. हसत खेळत प्रशिक्षण पार पडले. सर्व मार्गदर्शकानी सरळ सोप्या भाषेत आणि सर्व शंका दूर करीत प्रशिक्षण दिल्याने समाधान वाटले आणि निवडणुकीसाठी आमचे मनोबल वाढले, असे राजूरचे प्रशिक्षणार्थी प्रा. विनोद एलमामे यांनी सांगितले. १४ कर्मचाऱ्यांना बजावण्यात आल्या नोटिसा प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिलेल्या १४ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच आपणाविरद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार कारवाई का करू नये? याबाबतचा लेखी खुलासा सदर नोटीस प्राप्त होताच २४ तासांच्या आत समक्ष उपस्थित राहून सादर करावा. खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास अथवा प्राप्त खुलासा समर्थनिय नसल्यास आपणाविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे म्हटले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article