सिंह तारका समूहामधून होणार उल्का वर्षाव:आकाशात 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अमरावतीकरांना पाहता येणार

2 hours ago 1
रविवार १७ ते बुधवार २० नोव्हेंबर या कालावधीमध्ये सिंह तारका समूहातून उल्का वर्षाव होणार आहे. या उल्का वर्षावाचे लिओनिड्स हे प्रसिद्ध नाव आहे. उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य अमरावतीकरांना पाहता येणार आहे, असे खगोल अभ्यासकांनी सांगितले. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करतांना एखाद्या वेळी क्षणार्धात एखादी प्रकाश रेषा चमकुन जातांना आपणास दिसते. या घटनेस तारा तुटला असे म्हटले जाते. खरे पाहता ही प्रकाश रेषा दुसऱ्या ताऱ्याची नसते. ती एक आकाशात घडणारी खगोलिय घटना आहे. तारा कधीही तुटत नसतो. या घटनेला उल्कावर्षाव असे म्हणतात. आगामी १७, १८ व १९ च्या पहाटे उल्का वर्षावाची शक्यता जास्त राहील. उल्का वर्षावाची तीव्रता निश्चीत तारीख व वेळ या गोष्टी खात्रीने सांगता येत नाही. निरीक्षणाची तयारी आणि सोशिकता असलेल्यांनीच उल्का पाहण्याचा प्रयत्न करावा. पडले घराबाहेर आणि भराभर उल्का पडतांना दिसल्या अशी अवास्तव कल्पना करुन घेऊ नये. उल्काचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणाच्या शास्त्रीय नोंदी यांची खगोल जगतात खुप गरज आहे. धूमकेतू सूर्याला प्रदक्षिणा घालून जात असतांना त्यातील काही भाग मोकळा होतो हे धूमकेतूने मागे टाकलेले अवशेष होय. या उल्का एखाद्या तारका समुहातून येत आहे असे वाटते. तासाला ६० किंवा त्याहून अधिक उल्का आकाशातील एखाद्या भागातून पडत असतील तर त्यास उल्का वर्षाव असे म्हणतात. काही वेळा गतीमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येतांना त्या घनरूप अवस्थेत पृथ्वीवर येतात तेव्हा त्यास अशणी असे म्हणतात. उल्का शास्त्रात अशणीचे स्थान फार मोठे आहे. बाह्य अवकाशातील वस्तुचे नमुने या अशणीमुळे आपणास मिळतात. त्यामुळे वस्तुच्या जडणघडणीचा अर्थ आपणास लावता येतो. ज्यावेळी एखादी उल्का आपणास पडतांना दिसते. या संदर्भात नागरिकांमध्ये अंधश्रध्दा खुप आहे. परंतू, अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कोठेही आधार नाही. सिंह तारका समूहातून होणारा हा उल्का वर्षाव टेम्पलटटल या धुमकेतूच्या अवशेषामुळे होतो. हा धूमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो. आकाशप्रेमींना साध्या डोळ्यांनी बघता येईल उल्का वर्षाव अगदी साध्या डोळ्यांनी आपल्याला मध्यरात्रीनंतर घराच्या गच्चीवरुन किंवा शहराबाहेर जावून अंधारातून पाहता येईल. सर्व खगोल प्रेमींनी व जिज्ञासूंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य अवश्य बघावे. असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रविण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article