सुभाष झांबड 5 दिवसांसाठी पोलिस कोठडीत:अजिंठा अर्बन बँकेत 97.41 कोटींचा घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई
2 hours ago
3
अजिंठा अर्बन बँकेत ९७.४१ कोटींचा घोटाळा करून शहरातच छुप्या पद्धतीने फिरणारा सुभाष झांबड अखेर ४७४ दिवसांनंतर शुक्रवारी (७ फेब्रुवारी) पोलिसांसमोर शरण आला. त्याची १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याच्या अटकेसाठी २३ हजार ठेवीदारांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते. तो काही काळ सूरत येथे नातेवाइकाकडे, तर काही दिवस पुण्यातील त्याच्या निवासस्थानी राहायचा. याच कालावधीत तो प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जाऊन आला. बँक घोटाळा प्रकरणात झांबडने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. तेथे अर्ज नाकारल्यानंतर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तेथेही निराशा पदरी पडल्यानंतर थेट सर्वोच्च न्यायालय गाठले. सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने शरणागती पत्करण्याशिवाय झांबडसमोर कोणताही पर्याय नव्हता. अखेर शुक्रवारी त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्कारली. त्याच्या अटकेनंतर अनेक ठेवीदारांनी पैसे लवकर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कारवाईतून वाचण्यासाठी झांबडने भाजप प्रवेशाचा केला होता प्रयत्न अजिंठा बँकेतील ९७.४१ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या १५महिन्यांपासून फरार असलेलाबँकेचा अध्यक्ष, माजी आमदारसुभाष झांबड पोलिसांना शरणआला. या प्रकरणात त्याच्यासह सर्व संचालक मंडळावर गुन्हा दाखलआहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरस्वत:ला वाचवण्यासाठी त्याने प्रयत्नकेले. मंत्र्यांच्या माध्यमातून थेटमुंबईत प्रदेश कार्यालयातील वरिष्ठांच्या भेटी घेतल्या होत्या. परंतु,पदाधिकाऱ्यांचा विरोधामुळे त्याचाप्रवेश होऊ शकला नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेचे सीईओ प्रदीप कुलकर्णी यांच्यासह अन्य संचालकांना अटक केलीहोती. तेव्हापासून झांबड फरार होता.या गुन्ह्यापासून सुटका मिळावीयासाठी त्याने राजकीय वजन वापरत भाजपला साकडे घातले होते. परंतु,त्यावर निर्णय झाला नाही. लोकसभा निवडणुका जाहीरझाल्यानंतर झांबडने तत्काली नउपमुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेटघेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु, त्यानंतरही तोडगा न निघाल्याने भाजपत प्रवेश होऊ शकला नाही.
भाजपकडून कुटेची हकालपट्टी, काँग्रेसचे झांबडला अभय अजिंठा बँकेत घोटाळा झाल्यानंतर ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीमधीलघोटाळा उघड झाला. ‘ज्ञानराधा’चा सर्वेसर्वा सुरेश कुटे याने काहीमहिन्यांपूर्वीच भाजपत प्रवेश केला होता. परंतु घोटाळा झाल्यानंतरठेवीदारांनी भाजपसह किरीट सोमय्यांकडे तक्रारी केल्या त्यानंतर एकाचदिवसात कुटेची भाजपमधून हकालपट्टी केली . मात्र, माजी आमदार सुभाष झांबड याच्यावर काँग्रेस पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही.त्याच्याविरोधात ठेवीदारांचा रोष आहे. तरीही तो काँग्रेस पक्षातच आहे.
ठेवीदारांचे पैसे कधी मिळणार? प्रशासकांनी सांगितली प्रक्रिया डीआयजीसीसी इन्शुरन्सचे क्लेम झाले आहेत. त्यानुसार अनेक ठेवीदारांना पैसे मिळालेले आहेत. ज्यांच्या काही दुरुस्त्या बाकी आहेत त्यांच्या दुरुस्त्या करण्याचे काम सुरू आहे. सहकार कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. ज्यांचे इन्शुरन्स बाकी आहेत त्यांचे तयार करून पाठवणे सुरू आहे. उर्वरित वसुलीची कारवाई सुरू आहे. ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांच्याकड़ून वसुली करण्यात येत आहे. कायद्यानुसार कारवाई केली जाईल. त्यानुसार ठेवीदारांचे पैसे दिले जातील. मी दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. योग्य कारवाई करत ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्यात येतील. -ज्ञानेश्वर मातेरे, प्रशासक, अजिंठा अर्बन. ‘बाळा, आज सुखाने जेवणार’ झांबडला न्यायालयात हजर केल्यावर ठेवीदारांची गर्दी झाली होती. सुनावणी पूर्ण झाल्यावर त्यातील ७० वर्षांचे जवाहरलाल जैन यांनी पोलिसांना बघून ‘बाळा, आज सुखाने जेवणार,’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यांना सिल्लोडच्या शासकीय कामात मावेजा म्हणून ५० लाखांची रक्कम मिळाली होती. ती रक्कम बँकेत असल्याने त्यांनी लढा दिला. खात्यांची नावेच काल्पनिक दुसऱ्या गुन्ह्यात ३६ खात्यांतून लोन अगेन्स्ट एफडी मंजूर केले. यातील केवळ पाचच खात्यांची आणि नावांची शहानिशा झाली आहे. उर्वरित ३१ खात्यांची चौकशी बाकी आहे. ही नावे काल्पनिक असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या सोहम मोटर्स व झांबड कन्स्ट्रक्शन या इतर व्यवसायात बँकेतील तब्बल १० कोटी वळते झाल्याचे समोर आले. २०१६ ते २०२३ या कालावधीत बँकेच्या स्वनिधीमध्ये ७०.१४ कोटी, तर सीआरएआरमध्ये ३८.३० कोटींची तफावत दिसून आली. त्याचबरोबर ३६ खातेधारकांच्या खोट्या मुदत ठेवी व तारण दाखवून ६४.६० कोटींचे कर्ज वाटप केले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने गोपनीय पत्राद्वारे अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेवर आर्थिक निर्बंध घातले. बँकेतील घोटाळे लपविण्यासाठी पत घसरलेली असताना आरोपींनी ‘एसबीआय’मध्ये ९० लाख असताना १२ कोटी, ॲक्सिस बँकेत ३२ लाख असताना ९ कोटी, तर महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँकेत ७० लाख असताना ११ कोटी असल्याचे बनावट बँक बॅलन्स प्रमाणपत्र ३१ मार्च २०२३ रोजी रिझर्व्ह बँकेला सादर केले होते. दिव्य मराठी रोखठोक आज पुन्हा न्यायालयात एक आरोपी आला होता. आज पुन्हा न्यायालयात शेकडो फिर्यादी आले होते. तो न्यायालयात शरण आला होता पहिल्यांदाच. ते शेकडो फिर्यादी न्यायालयाचे उंबरे झिजवत होते गेल्या वर्षभरापासून. त्याचे कपडे पांढरे स्वच्छ होते. इस्त्री केलेले... स्टार्च लावलेले. त्या शेकडो फिर्यादींचे कपडे होते धुळीत माखलेले. इस्त्रीवाला पैसे मागतो हो... त्याच्या कपड्याची इस्त्री कुठेही मोडलेली नव्हती. शेकडो फिर्यादींच्या कपड्यांनी इस्त्री पाहून वर्ष लोटलं होतं. हा फरक होता एका आरोपी आणि शेकडो फिर्यादींमध्ये. हा फरक होता सुभाष झांबडमध्ये आणि शेकडो ठेवीदारांमध्ये. त्याचा रुबाब दिसत होता विजय मल्ल्यासारखा. शेकडो ठेवीदार दिसत होते उद््ध्वस्त झाल्यासारखे. असे म्हणतात की केवळ न्याय जाहीर केल्याने सर्वकाही होत नाही. न्याय झाल्याचे दिसलेही पाहिजे. झांबड गजाआड झाला म्हणजे सर्वकाही झाले असे काही नाही. आपण फार मोठा पराक्रम केला, असे पोलिसांनी वाटून घेण्याची गरज नाही. फरार आरोपीला शोधणे सोपे, पण झांबडसारख्यांनी पळवलेला गोरगरिबांचा पैसा शोधणे सोपे नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा असा तपास करावा की जणू काही त्यांचेच पैसे झांबडने लुटले आहेत आणि त्यांच्या मुलांची फी भरणे बाकी आहे. अशा वेळी त्या पित्याचा जो संतप्त आक्रोश असतो तो आपलाच आहे असे समजून पोलिसांनी शेकडो गोरगरिबांचे पैसे परत मिळवून दिले तरच न्याय झाल्याचे दिसून येईल. एरवी लोकप्रतिनिधी म्हणून कायम जनतेत असणारा झांबड ४७४ दिवसांनंतर सार्वजनिकरीत्या समोर येत होता. न्यायालयातदेखील तो पांढरा स्टार्च केलेला शर्ट परिधान केलेला होता. त्याची इस्त्रीही मोडली नव्हती. त्याला पाहण्यासाठी ठेवीदारांची गर्दी होती.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)