नांदगावमध्ये मोठा राडा झाला आहे. शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना अपक्ष उमेदवार समीर भुजबळांच्या समर्थकांनी आडवले आहे. यानंतर धक्काबुक्की आणि दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा राडा झाला आहे. या मतदारसंघात तिहेरी निवडणूक आहे. महायुतीकडून शिवसेनेच्या सुहास कांदेंना तर मविआकडून ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक हे उमेदवार आहेत. तर समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कांदे-भुजबळांमध्ये वाद सुहास कांदे आणि भुजबळ यांचे वैर सर्वश्रृत आहे. समीर भुजबळांना नांदगावातून विधानसभा निवडणूक लढवायची होती. पण शिंदेसेनेचे सुहास कांदे विद्यमान आमदार असल्यानं नांदगावची जागा त्यांना सुटली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार म्हणून नांदगावातून रिंगणात उतरले. मनसे उमेदवारांचा ठाकरे गटाला पाठिंबा नांदगाव मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. सोनावला यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर करत ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांना पाठिंबा दिला आहे. सोनावाला यांनी भर सभेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश केला आहे. भुजबळांच्या सभेत कांदे समर्थकाने घातला गोंधळ नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या सभेत गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला. नांदगाव तालुक्यातील साकूर या गावात समीर भुजबळ यांची सभा होती. या सभेत विरोधील उमेदवार सुहास कांदे यांच्या टीका करताना एका जण उठून आला आणि सुहास कांदे यांच्यावर टीका करू नका, असे म्हणत त्याने भर सभेत गोंधळ घातला. यानंतर समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ करणाऱ्याला बाहेर काढल्याचे पाीायला मिळाले होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)