बॉलिवूडमध्ये आता सेलिब्रिटी किड्सचा ट्रेन्ड सुरू झाला आहे. अनेक सेलिब्रिटी किड्स हे OOTच्या माध्यमातून, चित्रपटाच्यामाध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच आता अजून एका सेलिब्रिटी किड्सचा चित्रपट भेटीला येणार आहे. त्या चित्रपटाचं पोस्टरही शेअर करण्यात आलं आहे.
‘नादानियां’चे पोस्टर शेअर
नेटफ्लिक्स इंडियाने सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खानच्या पहिल्या चित्रपटाचे ‘नादानियां’चे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा आहे, ज्यात इब्राहिम आणि खुशी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम यांनी केले आहे.
इब्राहिम अली खानच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘नादानियां’ आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर दोघेही कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहेत आणि ते एका मैदानासारख्या जागेवर बसलेले दिसत आहेत.
‘नादानियां’ चित्रपटात रोमँटिक ड्रामा
नेटफ्लिक्सने या चित्रपटाबाबत काही हिंट दिल्या आहेत. जसं की ‘नादानियां’ चित्रपटात रोमँटिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. ज्यात तरुणाईचे जीवन, विशेषत: त्यांच्या पहिल्या प्रेमाचा अनुभव दाखवण्यात आला आहे. पिया नावाची मुलगी आणि अर्जुन नावाच्या मुलाभोवती चित्रपटाची कथा फिरते.
पिया ही दक्षिण दिल्लीची एक धाडसी मुलगी आहे, तर अर्जुन हा नोएडाचा मेहनती मुलगा. दोघांचं जग हे पूर्णपणे वेगळं आहे, पण जेव्हा ते भेटतात तेव्हा त्यांचा प्रवास कसा असणार आहे हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
इब्राहिम अली खानचा पहिला चित्रपट
याआधी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या शौना गौतमने चित्रपटाच्या दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. ‘नादानियां’ हा इब्राहिम अली खानचा पहिला चित्रपट असून याद्वारे तो त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करत आहे.
खुशी कपूरबद्दल चाहत्यांची नाराजी
चित्रपटात इब्राहिमसोबत खुशी कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र चाहत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी खुशी कपूरच्या ऐवजी दुसरी कोणतीही अभिनेत्रीला कास्ट केलं असतं तरी चालंल असतं पण खुशी कपूर नको अशा कमेंट जवळपास सर्वच नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे आणि इब्राहिम- खुशीच्या अभिनयाचे, त्यांच्या भूमिकेचे अनेक कंगोरे समोर येतीलच. त्यामुळे पोस्टर पाहून आता चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे.