सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्यांना दुहेरी फटका बसत आहे.Pudhari Photo
Published on
:
28 Nov 2024, 12:41 am
Updated on
:
28 Nov 2024, 12:41 am
सोलापूर : नुकत्याच संपलेल्या खरिप हंगामातील सोयाबीन पिके पावसाच्या कचाट्यातून कशीबशी वाचली आहेत. त्यातून शेतकर्यांना चार पैसे मिळतील. उत्पादन खर्च निघेल अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकर्यांच्या पदरी निराशाच आली आहे. सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्यांना दुहेरी फटका बसत आहे.
अतिवृष्टी तसेच हमीभाव न मिळाल्याचा सोयाबीन उत्पादकांना दुहेरी फटका बसला आहे. शासनाच्या दुर्लक्षाने सोयाबीन उत्पादकांत नाराजी आहे. पावसात भिजल्यामुळे सोयाबीनची प्रत अनेक भागांत खालावली आहे. अतिवृष्टी आणि हमीभाव या दोन्ही आघाड्यांवर शेतकर्यार्यांना फटका बसला आहे. हंगामात सरकारने 13 लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचे ठरवले होते. साधारण 30 ते 35 संस्थांना त्याच्या खरेदीसाठी मान्यता दिली होती. प्रत्यक्षात खरेदीसाठी सोलापुरात यंत्रणा पुढे आलीच नाही. जगातील सोयाबीनच्या एकूण उत्पादनातील सव्वातीन टक्के उत्पादन भारतात होते. त्यात मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक येतो. शेती फायद्याची होण्यासाठीचा सरकारची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने गेल्या वर्षभरापासून राज्यामध्ये कांदा आणि आता सोयाबीनच्या दराचा विषय ऐरणीवर आहे.