सोलापुरात चार जनावरांवर हल्ला करून वाघ पसार:गाय, दाेन वासरांसह रेडकाला केले ठार
3 hours ago
1
उकडगाव शिवारात चरण्यास नेलेल्या जनावरांच्या कळपात घुसून वाघाने एका शेतकऱ्याच्या गाय, दाेन वासरे व एक रेडकू अशा चार पाळीव जनावरांवर एकाच वेळी हल्ला चढवून ठार केल्याची गंभीर घटना समाेर आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गुरे चरण्यास घेऊन गेलेल्या शेतकरी नामदेव गोविंद थोरात यांच्या समाेरच घडली. २० किमीवरून वाघाने हल्ला केला. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केल्याचे सांगण्यात आले. वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला तरी पिंजऱ्यात आलेला नाही. सलग चौथ्या दिवशी ताडोबाच्या रेस्क्यू पथकाच्या हाती निराशाच आली आहे. दुसरीकडे वाघाने आपली चाल बदलली असून उकडगाव भागात चरण्यास नेलेल्या जनावरांच्या कळपावरच हल्ला चढवल्याने ताे अधिकच चवताळला काय, अशी शंका उपस्थित हाेत आहे. शेतकरी नामदेव थाेरात म्हणाले की, मी नेहमीप्रमाणे अभयारण्य क्षेत्रातील गवताळ भागात ४० जनावरे चरण्यास घेऊन गेलाे हाेताे. सायंकाळी कळपाच्या मागून येऊन वाघाने हल्ला चढवला. कळपातील एक गाय, दाेन वासरे व एक रेडकू अशा चार जनावरांवर हल्ला करून ठार केलं. मी साधारण वीस फुटांवर असेन. भीतीने घाबरुन गेलाे गेलाे. गावचे पाेलिस पाटील नितीन पाटील यांच्यामार्फत वन विभागाला घटना कळवल्यानंतर पंचनामा केला. इथले भय काही संपेना, चर्चा बिबट्या, वाघाची वैराग भागातील नागरिक सलग पंधरा दिवसांपासून वाघाच्या दहशतीखाली होते. दररोज वन्य प्राण्यांकडून हल्ले होतच आहेत. त्यामुळे सर्वत्र याच विषयाची चर्चा रंगत आहे. शाळेत मुलांमध्ये, चाैका-चौकात, पारावर, शेतात काम करताना महिलांमध्ये ही केवळ बिबट्या आणि वाघाचीच चर्चा रंगू लागली आहे. सध्या शेतातील काढणीचे दिवस आहेत, अशाच काळात वाघ नि बिबट्याचे शेतकऱ्यांमध्ये भयाचे वातावरण आहे. दरम्यान, बिबट्याने माझ्या वासरावर तुळजापूर तालुक्यातील काटी हद्दीत हल्ला केल्याची घटना वन विभागाला कळवली गेली. परंतु कर्मचारी वेळेवर पोहोचले नाहीत. वन विभागाचे वाहन उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले गेले. बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने तातडीने जेरबंद केले जावे, असे शेतकरी नागेश चंद्रकांत कापसे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले आहे. रेस्क्यू पथकाच्या हालचालींविषयी कमालीची गुप्तता वन विभागाच्या रेस्क्यू पथकाच्या अनुभवाचे दररोजचे अपडेट सध्या माध्यमांना अधिकृतपणे दिले जात नाही. कमालीची गुप्तता पाळली जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना काही विचारले तर वरिष्ठांकडे बाेट दाखवले जात आहे. वन विभागाचे अनुभवी पथक वाघाला जेरबंद करण्यास आले असले तरी ताे सापडण्या एेवजी वाघ हल्लेच करु लागल्याने वन विभागाच्या पथकाची चांगलीच दमछाक झाली आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाघाचा हा शुक्रवारचा उकडगावातील हल्ला हिंस्र स्वरूपातील आहे कायॽ त्याचे वर्तन हिंस्त्र स्वरुपाचे आहे कायॽ अशी विचारणा केली असता त्याने भक्ष्य म्हणूनच हल्ला केला असावा असे कळवले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)