हॉट सीट नवी मुंबई मतदारसंघ:शिंदेसेनेच्या चौघुलेंचे बंडभाजपच्या नाईकांना धोका

2 hours ago 1
नवी मुंबईवर कधी काळी गणेश नाईक कुटुंबांची एकहाती सत्ता होती. तोच काळ परत आणण्यासाठी पुन्हा नाईकांनी खेळी केली. आधी ऐरोली, बेलापूर दोन्ही मतदारसंघांतून नाईक पिता-पुत्रांनी भाजपकडे तिकीट मागितले. मात्र, ऐरोलीतून गणेश नाईक यांना संधी मिळाली तर संदीप नाईक यांना तिकीट नाकारण्यात आले. म्हणून संदीप यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. आता ऐरोलीत गणेश नाईकांच्या विरोधात उद्धवसेनेचे मनोहर मढवी लढत आहेत. ही सरळ लढत नाईक यांना सोपी गेली असती, पण शिंदेसेनेचे विजय चौघुले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने ऐरोलीत माजी मंत्री गणेश नाईक यांची वाट बिकट झाली आहे. महायुतीतील मतांच्या विभाजनांचा फायदा उद्धवसेनेच्या मनोहर मढवींना होण्याची शक्यता आहे. युनियन लीडर ते राजकीय नेता असा गणेश नाईक यांचा प्रवास आहे. ते १९९५ मध्ये पहिल्यांदा युतीचे सरकार आल्यावर मंत्रीही झाले होते. पण पुढे त्यांचे शिवसेनेत विरोधक वाढल्याने त्यांंनी शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथे चांगले बस्तान बसवले होते. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेतृत्व अशी त्यांची ख्याती झाली होती. पण त्यांना २०१४ मध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी पराभूत केले होते. त्याची प्रचंड चर्चा झाली. तेव्हापासूनच नाईक विरुद्ध म्हात्रे संघर्षाची ठिणगी पडली होती. २०१९ मध्ये गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ऐरोली मतदारसंघातून ते निवडून आले. या वेळी पुन्हा एकदा त्यांचा बालेकिल्ला फोडण्यासाठी विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. त्यांच्याविरोधात मैदानात उतरलेल्या शिंदेसेनेच्या चौघुले यांच्या पाठीशी काही नगरसेवक आहेत. कधी काळी नाईक आणि चौघुले यांच्यात गुरू-शिष्यांचे नाते राहिले आहे. त्या नात्याची आठवण करून देत अखेरच्या दोन दिवसांत चौघुले यांच्या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न गणेश नाईक यांनी सुरू केला आहे. त्यात ते कितपत यशस्वी ठरतात यावर त्यांचे भवितव्य ठरेल. मध्यमवर्गीय निर्णायक ऐरोली विधानसभा मतदारसंघात मध्यमवर्गीय आणि झोपटपट्टीबहुल वस्ती सर्वाधिक आहे. ५७ नगरसेवकांपैकी जवळपास २० जण झोपडपट्टीबहुल भागातून निवडून आले आहेत. येथे आगरी समाजाचीही वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. गावठाणातील अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. एपीएमसी मार्केटमुळे माथाडी वर्गाची मोठा मतदारवर्ग या भागात राहतो. यात मध्यमवर्गीय मतदार निर्णायक आहेत. तेच आमदार ठरवणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article