लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन
नागपूर (Dr. Nitin Raut) : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी आज सकाळी बेझनबाग येथील गुरुनानक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या खोली क्र.५ येथे सहपरिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी डॉ. राऊत (Dr. Nitin Raut) यांच्या सोबत पत्नी सुमेधा राऊत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, आकांशा राऊत, मुलगी दीक्षा रामटेके यांनीही मतदान केले. मतदान हा आपला हक्क व कर्तव्य आहे. देशातील आणि राज्यातील लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही यावेळी डॉ. राऊत यांनी केले.
मतदाना करिता रांगेत उभे राहिले डॉ. नितीन राऊत
बेझनबाग येथील गुरुनानक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजातील खोली क्रमांक ५ मध्ये मतदान करण्याकरिता राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूर मतदार क्षेत्रातील काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) रांगेत आपल्या नातं सह उभे होते. मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या असल्याने संपूर्ण राऊत कुटुंबीयांनी रांगेत राहूनच मतदान केले.