Budget 2025 रोजीच सोने आणि चांदीच्या किंमतीत तुफान आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात किंमतीत मोठी घसरण झाली. तर त्यानंतर दरवाढीचा आलेख दिसून आला. सोने 1200 रुपयांनी वधारले. तर चांदी 3 हजारांनी उसळली. ऐन अर्थसंकल्पाच्या दिवशीच दोन्ही धातुत मोठी वाढ झाली. ग्राहकांच्या खिशावर दरोडा पडला. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीची आता अशी आहे किंमत. (Gold Silver Price Today 1 February 2025 )
सोन्याची रॉकेट भरारी
मागील दोन आठवड्यात सोन्यात 3000 रुपयांची दरवाढ झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला अनुक्रमे 170 आणि 320 अशी 490 रुपयांची घसरण झाली. तर 29 जानेवारीला सोने 920 रुपयांनी, 30 जानेवारी रोजी 170 तर 31 जानेवारी रोजी 131 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 77,460 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 84,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हे सुद्धा वाचा
चांदी लाखाच्या उंबरठ्यावर
चांदीने या महिन्यात दरवाढीला ब्रेक लावला असला तरी अनेकवेळा मोठी झेप घेतली. या 24 जानेवारीला 1 हजारांची दरवाढ तर 27 जानेवारीला 1 हजारांची घसरण झाली. त्यानंतर 30 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी वधारली. 31 जानेवारी रोजी त्यात हजारांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,600 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 82,086, 23 कॅरेट 81,757, 22 कॅरेट सोने 75,191 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 61,565 रुपये, 14 कॅरेट सोने 48,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,533 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.