हिंगोली(Hingoli) :- हिंगोली ते रिसोड मार्गावर कवठा पाटीजवळ भरधाव शाळकरी बसने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत २ जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. घटनेबाबत सेनगाव पोलिसात गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
शाळकरी बसने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत २ जण ठार
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील शेख अरिफ शेख युसूफ (३८) यांचे पोल्ट्री फार्म
असुन त्यांच्या सोबत त्यांच्याच गावातील उत्तम झिंगराजी भगत (६०) हे काम करतात. बुधवारी रात्रीच्या सुमारास काम आटोपून दोघेही मोटार क्रमांक एमएच ३८ एच २४२७ यावरून निघाले होते. रिसोड करून भरधाव वेगात येणारी मार्कर पेनने लिहलेला क्रमांक एमपी ११ टी ४१६ या शाळकरी बसच्या (school bus)चालकाने आपले वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून कवठा पाटीजवळ मोटार सायकलला धडक दिल्याने उत्तम भगत यांचा जागीच मृत्यू झाला तर शेख आरेफ हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर शाळकरी बस चालकाने जागेवर बस सोडून पलायन केले.
अपघातानंतर शाळकरी बस चालकाने जागेवर बस सोडून पलायन
सेनगाव अपघाताची माहिती सेनगाव पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्यासह जमादार सुभाष चव्हाण, राजेश जाधव, टि. के. वंजारे, राम मारकळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांसह पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या शेख आरेफला सेनगाव ग्रामीण रुग्णालयात (Hospital) आणले. प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचाराकरीता हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर शेख आरेफला मृत (Dead) घोषित केले. अपघातात कोळसा गावातील दोघांचा मृत्यू झाल्याची वार्ता कळताच गावावर शोककळा पसरली. या अपघाता संदर्भात ६ फेब्रुवारी सेनगाव पोलिस ठाण्यात शेख आसिफ शेख यूसुफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाळकरी बसचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनकांबळे हे करीत आहे.