Icc Champions Trophy : पीसीबीला बीसीसीआयसोबत पंगा महागात, आयसीसीने लायकी दाखवली

3 hours ago 1

Icc Champions TrophyImage Credit source: Andrew Matthews/PA Images via Getty Images

बीसीसीआयने टीम इंडियाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तानध्ये पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान पाकिस्तान टीम इंडियामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं हायब्रिड पद्धतीने आयोजन करण्यास तयार नाही. दोन्ही देश हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशात आता आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. आयसीसीने नक्की काय निर्णय घेतलाय? हे जाणून घेऊयात.

आयसीसीच्या स्पर्धेआधी ती ट्रॉफी यजमान देशातील प्रमुख शहरांमध्ये फिरवण्यात येते. भारताकडे आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान होता. तेव्हा स्पर्धेआधी पुण्यासह भारतातील प्रमुख शहरांमध्ये ही ट्रॉफी फिरवण्यात आली होती. क्रिकेट चाहत्यांना या ट्रॉफीचं दर्शन व्हावं, या हेतूने ‘ट्रॉफी टूर’चं आयोजन केलं जातं. त्यानुसार आता पाकिस्तान यजमान असल्याने तिथे ट्रॉफी टूरचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र पाकिस्तानला ट्रॉफी टूर अंतर्गत ही ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जाता येणार नाही, असं आयसीसीने ठणकावलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 14 नोव्हेंबरला ट्रॉफी टूरची घोषणा केली होती. त्यानुसार 16 ते 24 नोव्हेंबर दरम्यान स्कर्दू, मुरी, हंजा आणि मुजफ्फराबाद या शहरांमध्ये ट्रॉफी टूर होणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेटने ‘एक्स’ पोस्टवरुन सांगितलं. मात्र आता आयसीसीने पाकिस्तानला ही ट्रॉफी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घेऊन जाण्यापासून रोखलंय. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा झटका आहे.

पीसीबीकडून ट्रॉफी टूरची घोषणा

Get ready, Pakistan!

The ICC Champions Trophy 2025 trophy circuit kicks disconnected successful Islamabad connected 16 November, besides visiting scenic question destinations similar Skardu, Murree, Hunza and Muzaffarabad. Catch a glimpse of the trophy which Sarfaraz Ahmed lifted successful 2017 astatine The Oval, from 16-24… pic.twitter.com/SmsV5uyzlL

— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 14, 2024

थोडक्यात पण महत्त्वाचं

दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत प्रस्तावित आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक हे 11 नोव्हेंबरला जाहीर होणं अपेक्षित होतं. मात्र पाकिस्तानने आयसीसीला हायब्रिड मॉडेलबाबत त्यांची भूमिका सांगितलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेचं वेळापत्रकही आता लांबणीवर पडलंय.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article