टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी 20i सामन्यात झालेल्या एका घटनेवरुन वादाला तोंड फुटलं आहे. टीम इंडियाचा ऑलराउंडर शिवम दुबे याला बॅटिंग दरम्यान हेल्मेटला बॉल लागला. त्यामळे शिवम दुबेच्या जागी कन्कशन रुलनुसार हर्षित राणा याता सब्स्टीट्यूट म्हणून समावेश करण्यात आला. जेमी ओव्हरटन याने टीम इंडियाच्या डावातील 20 वी ओव्हर टाकली. ओव्हरटनने ओव्हरमधील टाकलेला पाचवा बॉल हा दुबेच्या हेल्मेटवर लागला. त्यामुळे इंग्लंडच्या डावातील 12 व्या ओव्हरदरम्यान दुबेच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला बॉलिंगसाठी बोलवण्यात आलं.
इंग्लंड या 5 सामन्याच्या मालिकेत 2-1 ने पिछाडीवर होती. त्यामुळे इंग्लंडसाठी चौथा सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक असा होता. मात्र हर्षित राणा याने मैदानात येताच सामना फिरवला. हर्षित राणा याने त्याच्या कोट्यातील 4 ओव्हरमध्ये 33 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा याने भेदक बॉलिंगने इंग्लंडला गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली आणि टीम इंडियाने चौथ्या सामन्यातील विजयासह मालिका जिंकली. टीम इंडियाने 15 धावांनी सामना जिकंला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला पराभव चांगलाच जिव्हारी लागला. बटलरने पराभवानंतर कन्कशन सब्स्टीट्यूटनुसार शिवमच्या जागी हर्षित आल्याच्या मुद्द्यावरुन संताप व्यक्त केला. इतकंच नाही तर टीम इंडियावर सोशल मीडियावरुन आणि इंग्लंड टीमकडून बेईमानी केल्याचा आरोप करण्यात आला.
बटलर नक्की काय म्हणाला?
ही लाईक टु लाईक रिप्लेसमेंट नव्हती. आम्ही याबाबत सहमत नाही. शिवम दुबे याने एकतर त्याच्या बॉलिंग स्पीडमध्ये 25 किमी वेगाने गती वाढवली आहे किंवा हर्षित राणा याने त्याच्या फलंदाजीत सुधारणा केलीय”, असं म्हणत बटलरने टीका केली. “तसेच हा एक खेळाचा भाग आहे. आम्ही हा सामना जिंकू इच्छित होतो. मात्र आम्ही या निर्णयाबाबत असहमत आहोत”, बटलरने अशा शब्दात कन्कशन सब्स्टीट्यूटवरुन संताप व्यक्त केला.
बटलर असहमत
Jos Buttler has had his accidental connected the like-for-like concussion replacement contention 👀
📺 Watch #INDvENG connected @tntsports & @discoveryplusUK pic.twitter.com/v32hbUTrlC
— Cricket connected TNT Sports (@cricketontnt) January 31, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा (कनकशन सब्स्टीट्यूट)
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.