Apple ने iPhone युजर्ससाठी iOS 18.1 अपडेट रोलआउट केल्यानंतर त्यात कॉल रेकॉर्डिंग करणंही शक्य होणार आहे. त्यामुळे सध्या आयफोन युजर्समध्ये कॉल रेकॉर्डिंगचीच चर्चा आहे. पण, तुम्हाला हे माहिती आहे का की, तुमच्यासाठी हे कॉल रेकॉर्डिंग धोकादायक ठरू शकतं.
देशभरात सायबर फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. लोकांची वाढती मागणी लक्षात घेता आयफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचे नवे फिचरही आले आहे. मात्र, तुम्हाला काही गोष्टींची माहिती हवी. त्यामुळे तुम्ही देखील नाहक गोष्टींपासून दूर राहू शकतात. कारण, जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी पूर्ण माहिती नाही, तोपर्यंत ती गोष्ट करू नये किंवा वापरू नये.
खटलाही चालवला जाऊ शकतो
भारतात कॉल रेकॉर्डिंग बेकायदेशीर नाही. कोणताही दोन पक्ष कॉल रेकॉर्ड करू शकतो. साधारणपणे कॉल सुरू केल्यावर नोटिफिकेशन दिलं जातं. या नोटिफिकेशनमध्ये युजरचा कॉल रेकॉर्ड होत असल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, बरेच युजर्स असे करणे टाळतात. पण असे अनेक देश आहेत जिथे तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकत नाही आणि अनेक प्रकरणांमध्ये तुमच्यावर खटलाही होऊ शकतो.
हे सुद्धा वाचा
अँड्रॉइड डिव्हाईसमध्ये ‘हे’ नवे फीचर
तुम्हाला माहिती आहे की, अँड्रॉइड डिव्हाईसमध्ये हे कॉल रेकॉर्डिंगचे फीचर आधीच उपलब्ध आहे, अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा आधीच देण्यात येत आहे. अनेक स्मार्टफोन्समध्ये याबाबत आधीच नोटिफिकेशन दिले जातात. कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर आधी सावध व्हा. तुमचा कॉल रेकॉर्ड केला जातोय, अशी देखील माहिती दिली जाते. आता मात्र Apple ने iPhone युजर्ससाठी हे फीचर दिले आहे. त्यामुळे आयफोन युजर्सने देखील हे लक्षात घेतले पाहिजे. कारण, तुमची अडचण वाढू शकते.
कॉल रेकॉर्डिंगची सुविधा स्मार्टफोन कंपन्यांकडून स्वतंत्रपणे दिली जात आहे. तुम्हालाही रेकॉर्ड करायचं असेल तर तुम्हाला त्या फीचरवर क्लिक करावं लागेल. पण ओळख पटवायची असेल तर कॉल दरम्यान एखादा मेसेज लक्षपूर्वक ऐकू शकता, जो सांगतो की तुमचा कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकतो. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
iOS 18.1 अपडेट इन्स्टॉल कसे करावे?
iPhone मध्ये कॉल रेकॉर्डिंग फीचर वापरायचे असेल तर तुमच्या डिव्हाईसमध्ये लेटेस्ट iOS 18.1 अपडेट इन्स्टॉल करावे लागेल. आता फोन अपडेट करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा आणि त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला iOS 18.1 चे सर्व अपडेट्स येतील.