मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना; योजनेचा लाभ बंद करण्यासाठी ८ अर्ज प्राप्त
हिंगोली (Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहेत. परंतु या योजनेतील गुढ रहस्य आता हळूहळू बाहेर येत असताना चार लाडक्या भावांची (CM Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत नाव टाकुन रक्कम उचचली. त्यातच शासनाने आता या योजनेतील लाभार्थ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याने कारवाईच्या भितीने या चार भावांचा उलगडा झाला.
विधानसभा निवडणूकीपुर्वी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात (Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंमलात आणली. या योजनेत पात्र महिलांना १५०० रुपये महिना देण्याची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यात ३ लाख ५० हजार महिलांनी लाडकी बहिण योजनेचे अर्ज दाखल केले. ऑनलाईन प्रस्ताव दाखल करताना आधारकार्ड, बँक खाते क्रमांक, छायाचित्र, राशनकार्ड आदी कागदपत्रे अपलोड केले. पंचायत समितीस्तरावर सदर अर्ज मंजूर केल्यावर महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली. त्यातच योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांची चौकशी करण्याबाबत वरिष्ठस्तरावरून सूचना दिल्या. त्यानूसार जिल्ह्यातून ८ जणांनी लाभ बंद करण्याचा अर्ज दिला. विशेष म्हणजे ४ लाडक्या भावांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता होणार्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिला व बालविकास कार्यालयात योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ बंद करण्या संदर्भात ८ अर्ज प्राप्त झाले असुन त्यामध्ये ४ पुरूषांची नावे असल्याचे दिसून आले. त्यांनी आधारकार्डवर महिलांचे छायाचित्र लावून प्रस्ताव दाखल केल्याचे उघड झाले. या चौघांच्या बँक खात्यावर सहा हप्ते जमा झाले असुन सदर चारही पुरूष औंढा नागनाथ तालुक्यातील महेश भांडे, गजानन काळे, शिवाजी भांडे, रामराव काळे हे असल्याचे सांगण्यात आले आहे.