नालासोपारा पूर्वेला अग्रवाल नगरी येथील लक्ष्मी नगरमध्ये डंपिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटसाठी आरक्षित भूमिवर ४१ बेकायदा इमारतींवर आज पालिका प्रशासनाचा हातोडा पडणार आहे.
मुंबईतील नालासोपाऱ्यातील तब्बल ४१ अनधिकृत इमारतींवर आज हातोडा पडणार आहेत. वसई-विरार महानगर पालिका प्रशासन इमारतींचं तोडकाम करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात येत आहे. ४१ इमारतींपैकी ७ इमारती या आधीच जमीनदोस्त कऱण्यात आल्या आहेत. वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर या ४१ इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र पालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या या कारवाईनंतर २०० कुटुंब बेघर होतील. नालासोपारा पूर्वेला अग्रवाल नगरी येथील लक्ष्मी नगरमध्ये डंपिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटसाठी आरक्षित भूमिवर ४१ बेकायदा इमारती बांधण्यात आल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाने या इमारतींना बेकायदा असल्याचे सांगून पाडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाच पालन करताना वसई-विरार महानगर पालिकेने ४१ इमारतीमधील रहिवाशांना २२ जानेवारी २०२५ पर्यंत घर खाली करण्याची नोटीस बजावली होती. मात्र तरी देखील काही रहिवासी या इमारतीत वास्तव्य करत असल्याचे दिसून आले आहे. मात्र आदेशानंतर वसई-विरार महानगरपालिकेकडून नालासोपा-यात करणाऱ्यात येत असलेल्या कारवाईनंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तर हृदय पिळवटून निघाल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Jan 23, 2025 02:22 PM