जिंतूर ४९.०२ टक्के, परभणी ४४.९९ टक्के, गंगाखेड ५१.७५ टक्के, पाथरी ४८.०८ टक्के
परभणी (Parbhani Assembly Elections) : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदान क्षेत्रात दुपारी ३ वाजेपर्यंत ४८.८४ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी धिमी असलेली मतदानाची गती दुपारी थोडी वाढल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी (Parbhani Assembly Elections) बुधवारी मतदान होत आहे. परभणी जिल्ह्यात एकूण चार विधानसभा क्षेत्र आहेत. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४८.८४ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे. जिंतूर विधानसभेत ४९.२ टक्के, परभणी ४४.९९ टक्के, गंगाखेड ५१.७५ टक्के तर पाथरी विधानसभेत ४८.८ टक्के एवढे मतदान झाले आहे. मतदानासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ आहे. (Parbhani Assembly Elections) मतदान शांततेत पार पडावे यासाठी प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.