भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं पण भाजपने आश्वासन न पाळल्याने फसवणूक झाल्याचे शिंदेंना वाटतं, असा दावा सामनातून करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांच्याकडून सामनातील रोखठोकमधून खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे समाधी अवस्थेकडे पोहोचले असं शिवसेनेच्या आमदारानं विमान प्रवासात सांगितल्याची माहिती राऊतांनी दिली. तर मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे मनाने कोलमडले असल्याचेही आमदारानं सांगितल्याचे सामनातून संजय राऊत यांनी म्हटले. तर आपल्याच पक्षातील लोकांचे फोन टॅप होत असल्याचा एकनाथ शिंदेंना संशय असल्याचा दावाही करण्यात आलाय. भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं पण भाजपने आश्वासन न पाळल्याने फसवणूक झाल्याचे शिंदेंना वाटतं, असा दावा सामनातून करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या मित्र गटांना मोठे बहुमत मिळूनही राज्य पुढे जाताना दिसत नाही, याचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील विसंवाद आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री केले नाही या धक्कात शिंदे अजून झुलत आहेत आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी धडपडत आहेत, हे फडणवीस ओळखून असल्याचे सामानातून म्हटले आहे.
Published on: Feb 02, 2025 12:34 PM