Saif Ali Khan Attack – कपडे बदलले, हेडफोन खरेदी केले; सैफवर हल्ला करणारा संशयित दादरमधील सीसीटीव्हीत कैद

2 hours ago 1

सैफ अली खान याच्यावर हल्ला होऊन 48 तास उलटले तरी अद्याप पोलिसांचे हात हल्लेखोरापर्यंत पोहोचलेले नाही. मुंबई पोलिसांचे 30 पथकं हल्लेखोराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आहे, पण खरा हल्लेखोर पोलिसांना चकवा देताना दिसतोय. सैफवर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोराने कपडे बदलले आणि त्यानंतर दादरमध्ये हेडफोनची खरेदीही केली, असेही आता समोर आले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सैफ अली खानवर हल्ला करणारा संशयित दादरमधील सीसीटीव्हीत कैद #SaifAliKhan #SaifAliKhanAttacked pic.twitter.com/lhhJHRJMq9

— Saamana Online (@SaamanaOnline) January 18, 2025

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article