खरेदी केंद्राला मुदत वाढ देण्याची मागणी
परभणी/गंगाखेड (Soybeans Price) : शासनाच्या हमी भावात सोयाबीन खरेदी करणाऱ्या दोन खरेदी केंद्रावर गुरुवार ६ फेब्रुवारीपर्यंत २०४५ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांजवळील ३०२३७ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले असुन या खरेदी केंद्रास मुदत वाढ द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.
तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या (Soybeans Price) सोयाबीनची खुल्या बाजारात व्यापारी वर्गातून अव्वाच्या सव्वा दरात खरेदी होत असल्याने सोयाबीनची शासकीय हमी भावात खरेदी व्हावी यासाठी सुरु करण्यात आलेल्या खरेदी केंद्राची वाढीव मुदत गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी संपल्याने शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी शासकीय हमी भाव खरेदी केंद्र बंद करण्यात आले.
यात गंगाखेड तालुका खरेदी विक्री संघाच्या खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या १५८८ पैकी ४९५ शेतकऱ्यांजवळील ८१६२ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक सुधर्मा जाधव, बाळू भोसले, बाबासाहेब (नाना) भोसले यांनी दिली असुन नोंदणी केलेल्या १५८८ शेतकऱ्यांपैकी १०९३ शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी होणे शिल्लक आहे. तर धाराशिव फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. रुमणा (ज.) मार्फत सुरु करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या १६७० शेतकऱ्यांपैकी १५५० शेतकऱ्यांजवळील २२०७५ क्विंटल (Soybeans Price) सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक मंगेश सोळंके यांनी दिली आहे.
धाराशिव फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. रुमणा (ज.) च्या खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या १२० व खरेदी विक्री संघाच्या खरेदी केंद्रावरील १०९३ अशा एकुण १२१३ पेक्षा अधिक नोंदणीकृत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे (Soybeans Price) सोयाबीन खरेदी होणे बाकी शिल्लक असल्याने शासकीय हमी भाव देणाऱ्या खरेदी केंद्रास मुद्दत वाढ द्यावी अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकरी वर्गातून केली जात आहे.