वर्धा (Wardha Assembly Elections) : जिल्ह्यातील चार विधानसभेसाठी उद्या बुधवारी दि. 20 ला मतदान होणार आहे. या राष्ट्रीय उत्सवाच्या मतदान प्रक्रियेची सुरुवात आज कर्मचाऱ्यांना साहित्य वाटपापासून झाली. शहरातील जीएस कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणामध्ये (Wardha Assembly Elections) वर्धा विधानसभेकरिता मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
जिल्ह्यात एकूण 1342 मतदान केंद्र आहेत. आर्वी 310, देवळी 335, हिंगणघाट 351 आणि वर्धा 346 मतदान केंद्रे नियोजित आहेत. वर्धा मतदार संघाकरिता कर्मचाऱ्यांना साहित्य वाटपासाठी दोन सुसज्ज शामियाने उभारले. वातावरण आल्हाददायक करण्याकरिता सनई चे संगीत सकाळपासूनच सुरू ठेवले होते. प्रवेशदरापासून कर्मचाऱ्यांसाठी लाल कार्पेट टाकण्यात आले. सकाळी सहा वाजता पासूनच कर्मचारी यायला लागले होते.
या शामियानामध्ये 35 टेबल ठेवले असून यामध्ये 35 क्षेत्रीय अधिकारी व त्यांच्या सहाय्या करिता 70 कर्मचाऱ्यांची साहित्य वितरणासाठी व्यवस्था करण्यात आली. कर्मचाऱ्यांना सहज समजण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर कुठल्या टेबलवर आपला क्रमांक आहे याची माहिती दिली होती. आज सकाळी कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप आणि उद्या (Wardha Assembly Elections) मतदान झाल्यावर याच ठिकाणी मतदानाचे साहित्य परत करायला यावे लागणार आहे. केंद्राधिकाऱ्याने आपले साहित्य घेऊन त्याची तपासणी केली. एका केंद्रावर एक मुख्य केंद्र अधिकारी व त्यांच्यासोबत तीन कर्मचारी मदतीला असणार आहे. केंद्रावर वृद्ध व दिव्यांगा करिता स्वयंसेवक मदतीला असणार आहे.
जी एस कॉलेजच्या रोडवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. वाहतूक विभागाने चोख व्यवस्था सांभाळली. महाविद्यालयाच्या बाहेर दोन्ही बाजूला कर्मचारी व साहित्य देण्याकरिता वाहनांची रीघ लागली होती.
आजही टपाल मतदान झाले
टपाली मतदानाचा शेवटचा दिवस होता. निवडणुकीच्या कामाकरिता ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे, त्या कर्मचाऱ्यांसाठी आज ही व्यवस्था करण्यात आली होती.
एक पोलीस किंवा होमगार्ड असेल
मतदान साहित्य वाटप केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी बस जीप गाड्या व्यवस्था करण्यात आलेली होती. (Wardha Assembly Elections) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले आणि अप्पर पोलीस अधीक्षक सागर कडवे व्यवस्था पाहण्यासाठी आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक कारंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पुंडेकर यांना काही सूचना पण केल्या.