मानोरा(Washim):- शिवणी ते रतनवाडी रस्त्याचे मंजूर काम वन विभागाच्या (Forest Department) परवानगीअभावी थांबला होता. त्यासाठी उपवनसंरक्षक वाशीम वन विभाग कार्यालयात सुधारीत प्रस्ताव पाठविले असल्याने त्या प्रस्तावाला मंजुरी मिळताच रस्ता कामाला विनाविलंब सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम(Public works) उपविभाग याजकडून प्राप्त झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव सादर
अधिक माहिती अशी की, जिल्हा सीमा रस्ता डांबरी रस्त्याच्या वनक्षेत्र अस्तित्वातील रूंदीत मजबुतीकरण करण्यास वनसंरक्षक वाशीम वन विभाग कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. शिवनी – रतनवाडी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामासाठी वन विभागाच्या हद्दीत असलेल्या रस्ता कामाला परवानगी मिळून कामाला सुरुवात करण्यासाठी वनसंरक्षक वाशीम वनविभाग यांचे कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पण पाठविलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याने पुन्हा सुधारीत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला वनउपसंरक्षक वनविभाग कार्यालयाकडून मंजुरात मिळताच रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.