रिसोड (Washim) :- बहुजणांचे प्रेरणास्थान भगवानगडाचे मठाधिपती महंत डाॅ.नामदेवशास्री महाराज,भगवान गड गादीचे उत्तराधिकारी महंत कृष्णा महाराज शास्री,यांचे आज ता.21 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांच्या सिंदखेडराजा नगरी मधुन रिसोड येथे प्रथम आगमण झाले.महंतांचे भर जहागीर,रिसोड शहरामध्ये हजारो भक्तांनी फुलांची उधळण करीत जंगी स्वागत केले.
“एक एकर विका पण शाळा शिका”
बहुजण समाजाचे दैवत तथा “एक एकर विका पण शाळा शिका” या ब्रिद वाक्याचे जनक वैकुंठवाशी संत भगवान बाबांचे वंशज न्यायाचार्य महंत डाॅ.नामदेवशास्री महाराजांच्या माध्यमातुन आजही रंजल्या गांजलायाची सेवा अविरतपणे सुरू आसुन बहुजण समाजाला आजही शिक्षणाचे महत्त्व पटवुन देण्याचे काम महंत नामदेव शास्री महाराज करीत आहेत.महंतांचे आगमण भर जहागीर येथे होताच हिंदुधर्म प्रचारक ह.भ.प.दिनकर महाराज जायभाये, प्रा.पंढरीनाथ चोपडे, प्रमोद गरकळ, अनिल गरकळ यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी महाराजांचे पुष्पहारांनी स्वागत केले. यावेळी भर जहागीर येथिल श्री शिवाजी विद्यालयातील शिस्त पाहुण महाराज आनंदीत झाले, तर रिसोड येथिल मेहकर रोड वरील लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे चौक ते व्यंकटेश नगरा पर्यंत जेसिबीद्वारे पुष्पांची उधळ करीत, चार चाकी, दुचाकी शेकडो गाड्यांची शहरातुन रॅली काढण्यात आली.
हजारो भक्तगणांच्या चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली
शहरातील विविध ठिकाणी महारांचे पुष्पहारांनी स्वागत करण्यात आले.तर व्यंकटेश नगरातील ह.भ.प.सोपानशास्री महाराज सानप यांच्या निवाशी रॅली पोहचल्या नंतर हजारो भक्तांनी महंत डाॅ.नामदेवशास्री महाराजांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले.यावेळी ह.भ.प.सोपान शास्री महाराज यांच्या माध्यमातून हजारो भक्तगणांच्या चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.यावेळी बहुजण समाजातील लोणी,बोरखेडी,मोहजाबंदी, मांडवा,कु-हा,जवळा,भर जहागीर, आगरवाडी, कंकरवाडी ,कन्हेरी, चाकोली, हराळ, पळसखेडा, मांगवाडी, वाकदवाडी येथिल हजारो भक्तगणांची उपस्थिती होती.