चिपळूण : ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व सदस्य.मार्चमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषद या बैठकीचे उद्घाटन समाजवादी कार्यकर्ते अभिजीत हेगशेट्ये यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नित्यानंद भुते (क्रेडाई, रत्नागिरी) हे होते. यावेळी रत्नागिरी येथील आरोग्य, पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या पाच कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मार्च महिन्यात विदर्भात नागपूर येथे राज्यव्यापी ‘अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषद’ घेण्याचे ठरले.
Published on
:
07 Feb 2025, 12:50 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:50 am
चिपळूण : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच रत्नागिरी गांजुर्डा येथील ओंकार मंगल कार्यालयात झाली. या बैठकीत डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ स्थापन करून त्याद्वारे विविध ऑनलाईन कोर्सेसचे अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्याचे ठरवण्यात आले.
या बैठकीसाठी राज्यभरातून 17 जिल्ह्यातून 125 अंनिस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, राज्य विभागांचे कार्यवाह, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये संघटनेच्या पुढील कामाची दिशा म्हणून महत्त्वाचे सात ठराव घेण्यात आले. त्यानुसार, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून व्हावा म्हणून अंनिस तर्फे ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ स्थापन करून त्याद्वारे विविध ऑनलाईन कोर्सेसचे अभ्यासक्रम उपलब्ध करुन देणार अहोत. जादूटोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर व्हावा, यासाठी अंनिस देशपातळीवर प्रयत्न करणार, सुशिक्षितांचा अंधश्रद्धा या विषयी प्रबोधन अभियान राज्यभर राबवण्यात येणार आहे.
आंतरजातीय जातीय, आंतरधर्मीय विवाह, सत्यशोधकी विवाह करू इच्छिणार्यांची माहिती रहिमतपूर येथील अंनिसतर्फे सेफ हाऊस केंद्र चालवणार्या शंकर कणसे यांच्याकडे संकलित करून अंनिसच्या राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह वधू वर सूचक मंडळाचे काम सुरू करणे, जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य या विषयी काम करणार्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे, सोशल मीडियामधून पसरवल्या जाणार्या अंधश्रद्धा आणि मोबाईलचे व्यसन या विषयी काम करण्यावर भर दिला जाणार आहे.
दुपारच्या सत्रात गेल्या सहा महिन्यातील अंनिस तर्फे राज्यभरात राबवलेल्या विविध उपक्रम अहवालाचे वाचन राज्य कार्यकारी समिती सदस्य अॅड. मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलासकर यांनी केले. त्यानंतरच्या दोन सत्रात महाराष्ट्रातील राज्यभरातून आलेल्या जिल्हा कार्याध्यक्षांनी, सचिवांनी आपल्या जिल्ह्याचा कार्य अहवाल राज्य कार्यकारणी समोर सादर केला.
समितीचा महिला विभाग, प्रकाशन विभाग, संघटना बांधणी आणि प्रशिक्षण विभाग, बुवाबाजी संघर्ष, मानसिक आरोग्य विभाग, विविध उपक्रम विभाग, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह विभाग, सांस्कृतिक विभाग यांच्या कामाचा आढावा आणि पुढील सहा महिन्याचे नियोजन करण्यात आले.
या दोन दिवशीय बैठकीच्या सांगता समारोह कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहास विद्वांस, (कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी, रत्नागिरी) यांनी आम्ही भारतीय संविधान, वैज्ञानिक विचार असलेले कार्यक्रम आकाशवाणी वरुन प्रसारित करतो, असे सांगितले. पर्यावरण अभ्यासक डॉ. केतन चौधरी (रत्नागिरी शासकीय फिशरीज कॉलेज) यांनी सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. पत्रकार मुश्ताक खान यांचेही भाषण झाले.
दोन दिवसांच्या या राज्य कार्यकारणीचे संयोजन विनोद वायंगणकर, राहुल थोरात, राधा वणजू, वल्लभ वणजू, मधुसूदन तावडे, अतुल तांबट, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, प्रा. प्रवीण देशमुख, सम्राट हटकर यांनी केले.
मार्चमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषद
या बैठकीचे उद्घाटन समाजवादी कार्यकर्ते अभिजीत हेगशेट्ये यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नित्यानंद भुते (क्रेडाई, रत्नागिरी) हे होते. यावेळी रत्नागिरी येथील आरोग्य, पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या पाच कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मार्च महिन्यात विदर्भात नागपूर येथे राज्यव्यापी ‘अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषद’ घेण्याचे ठरले.