अकोला ः पिंजर पोलिस स्टेशन च्या आवारात असलेल्या बोअरवेल च्या 15 ते 20 फूट खोल खड्डय़ातून माकडाला सुरक्षित काढण्यात आले. मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने या माकडाला सुरक्षित बाहेर काढले. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
अधिक माहितीनुसार, पिंजर पोलीस ठाण्यात असलेल्या बोअरवेल अवती भवती माकडांचे टोळी किंकाऱ्या मारत होती. यामुळे येथील पिएसआय गजानन राहाटे यांनी जवळ जाऊन बघितले असता या बोअरवेल मधे एक माकडाचे पिल्लू पडलेले दिसून आले. तेव्हा लगेच येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख जीवरक्षक दिपक सदाफळे यांना माहिती दिली. पाच मिनिटातच पथकाचे मयुर सळेदार, विकी पिंजरकर, मयुर कळसकार, महेश वानखडे, अभिषेक मानतकर यांनी मोठ्या शिताफिने माकडाच्या पिल्लाला सुरक्षित रेस्क्यु करुन सुखरूप बाहेर काढले. यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.