Published on
:
07 Feb 2025, 12:50 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:50 am
रत्नागिरी : सिंधुदुर्गात आंगणेवाडीच्या यात्रेसाठी येणार्या भाविकांच्या सोयीसाठी मुंबईतील लो. टिळक टर्मिनसे ते सावंतवाडी दरम्यान दोन विशेष गाड्या रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.
याबाबत कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लो. टिळक टर्मिनस ते सावंतवाडी (01129) ही गाडी दि. 29 फेब्रुवारी रोजी एलटीटीयेथून मध्यरात्रीनंतर 12. 55 वाजता सुटेल आणि सावंतवाडीला ती त्याच दिवशी दुपारी 12 वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (01130) सावंतवाडी येथून 21 फेब्रुवारीला 6 वाजता सुटून दुसर्या दिवश सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी लो. टिळक टर्मिनसला पोहचेल.
एकूण 19 एलएचबी डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नाागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ थांबे घेणार आहे.
दुसरी विशे गाडी (01131/01132) ही गाडी देखील लो. टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी लो. टिळक टर्मिनस येथून दि. 22 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री नंतर 12 वा. 55 मिनिटांनी सुटून सावंतवाडीला त्याच दिवशी दुपारी 12 वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी मुबईत ती सकाळी 6 वा. 10 मिनिटांनी लो. टिळक टर्मिनसला पोहचेल.
एकूण 22 एएचबी डब्यांची ही विशेष गाडी देखील ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नाागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ स्थानकांवर थांबणार आहे.