उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर:जिल्हाप्रमुखांना म्हणाले - राज्यभर पक्षाची ताकद दाखवा, त्यानंतरच स्वबळाचा निर्णय घेऊ
7 hours ago
1
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच सक्रिय झालेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या राज्यभरातील जिल्हाप्रमुखांना अंग झटकून कामाला लागण्याचे संकेत दिलेत. विशेषतः राज्यभर पक्षाची ताकद दाखवल्यानंतरच आपण आगामी निवडणुका स्वबळावर लढवायची की नाही याचा निर्णय घेऊ असे ते म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाच्या नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गुरुवारच्या मेळाव्यात स्वबळाचे संकेत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी राज्यभरातील सर्वच जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी या सर्वांना अगोदर राज्यभर आपल्या पक्षाची ताकद दाखवा त्यानंतरच मी स्वबळाचा निर्णय घेईल असे ठणकावून सांगितले. या बैठकीत काही नेत्यांनी पक्षवाढीसाठी विविध उपाययोजना बोलून दाखवल्या. त्यात काहींनी पक्ष वाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करून त्यांना सर्वाधिकार देण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः राज्यभरात जाणाऱ्या संपर्कप्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेप कमी करून स्थानिक नेतृत्वाला अधिक सक्षम करण्याची आवश्यकही व्यक्त केली. त्यांच्या या सूचनेवरही उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे. उद्या रात्री 8 वा. संविधान, भारतमाता पूजन दुसरीकडे, ठाकरे गटाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 जानेवारी रोजी रात्री 8 वा. भारत माता व संविधानाचे पूजन करण्याच्या कार्यक्रमाचीही घोषणा केली आहे. खासदार संजय राऊत याविषयी बोलताना म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारी रोजी रात्री 8 वा. तालुका पातळीवर भारत माता व संविधान पूजन केले जाईल. यावेळी विशेष मिरवणूकही काढली जाईल. मुंबईत शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संविधान व भारत मातेचे पूजन केले जाईल. सद्यस्थितीत संविधान व भारत माता संकटात सापडली आहे. आपण त्याचे संरक्षण करत आहोत आणि त्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त हे पूजन केले जाईल, असे ते म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना नसानसांत भिनवूया ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शिवसैनिकांच्या नसानसांत भिनवण्याचे आवाहन केले. आज शिवसेना वाढावी असे प्रत्येक शिवसैनिकाला वाटत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक संकटे उधळवून लावत शिवसेना उभी केली. आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपवल्याचे विरोधकांना वाटत असेल, पण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आपण सर्वजण त्यांचे विचार शिवसेनिकांच्या नसानसांत भिनवूया, असे ते म्हणाले. हे ही वाचा...
अमित शहांची भुजबळांशी जवळ बसवून चर्चा:नाशिकच्या कार्यक्रमात दोघांत संवाद; नाराज भुजबळ भाजपमध्ये जाण्याची रंगली चर्चा नाशिक - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथील एका कार्यक्रमात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज नेते छगन भुजबळ यांना आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवले. यामुळे भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्याविषयीची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)