कुऱ्हा येथील दिंडी रिंगण सोहळ्यात 25 दिंड्या:पालख्यांसह वारकऱ्यांचा मेळा
2 hours ago
1
कार्तिक एकादशीनिमित्त रंगरावबाबा महाराज टापरे यांच्या संकल्पनेतून कौंडण्यपूरजवळील कुऱ्हा येथे १५ वर्षांपासून दिंडी रिंगण सोहळा साजरा करण्यात येतो. रिंगण सोहळ्याची सुरुवात रंगरावबाबा महाराज टापरे यांच्या प्रतिमा पूजन व अभिवादनाने झाली. या वेळी ज्ञानेश्वर महाराज पातशे, देशमुख महाराज गणोरी, श्यामसुंदर निचित, अक्षय महाराज हरणे, राजेंद्र मस्के महाराज, नामदेव महाराज, अशोक महाराज क्षीरसागर, गजानन महाराज चराटे उपस्थित होते. रिंगण सोहळ्यासाठी सकाळी १० वाजतापासूनच दिंड्या येण्यास प्रारंभ झाला होता. हा कार्तिक दिंडी रिंगण सोहळा श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या समोरच्या पटांगणात तिवसा रोडवर झाला. या सोहळ्यात २५ दिंड्या व पालख्यांसह शेकडो वारकऱ्यांचा मेळा होता. मंचाच्या एका बाजूला रिंगण घेऊन टाळ, मृदंगाच्या तालावर फुगड्यांचा ताल धरत वारकरी सहभागी झाले होते. या सोहळ्यानंतर दिंड्या व पालख्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्या.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)