करमळी : महाकुंभला जाणार्या भाविकांच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूला समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत, राजेश फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक व अन्य मान्यवर. Pudhari File Photo
Published on
:
07 Feb 2025, 12:36 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:36 am
पणजी : गोवा हे दक्षिणेकडील काशी आहे. गोवा पर्यटन राज्य आहे. ‘सन, सॅन्ड अॅण्ड सी’साठी प्रसिद्ध असले तरी गोवा आध्यात्मिक राज्य म्हणून विकसीत होत आहे. त्यासाठी विविध उपक्रम सरकार राबवत आहे. सनातन संस्कृती रक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी करमळी रेल्वेस्थानकावर महाकुंभला जाणार्या गोवेकर भाविकांच्या पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत, राजेश फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, सरपंच, रेल्वे अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, 128 वर्षांनी आलेल्या महाकुंभला स्नान करण्याची शेकडो गोवेकरांची इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सरकार तीन रेल्वे प्रयागराजला पाठवत आहे. यापुढच्या रेल्वे 13 व 21 फेब्रुवारी रोजी सुटतील. ज्यांना महाकुंभला जायचे आहे, त्यांनी समाजकल्याण खात्याकडे नोंदणी करावी. प्रवास व राहण्याची सोय सरकारने केली असल्याचेही ते म्हणाले.
जनतेची समृद्धी मागा : मंत्री फळदेसाई
मंत्री फळदेसाई म्हणाले, आपण भाग्यवान आहोत. महाकुंभासह अयोध्येत श्री राम मंदिर आपल्याला पाहता आले. महाकुंभला जाऊन पुण्य कमावताना राज्यातील जनतेसाठी सुख समृद्धीसाठी गार्हाणे घाला, असे आवाहन केले.