Published on
:
01 Feb 2025, 12:25 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:25 am
सोलापूर : घरासमोर सांडपाणी टाकल्याच्या कारणावरून हाताने व काठीने मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी केल्याची घटना 29 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रताप नगर तांडा येथे घडली. याप्रकरणी सुरताबाई लक्ष्मण जाधव (वय 70, रा. बंजारा सोसायटी, विजापूर रोड) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून मीराबाई रमेश राठोड (रा. प्रताप नगर तांडा) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी यांची मुलगी सुनिता राठोड हिच्या घरी फिर्यादी जाताना फिर्यादी यांच्या मुलीच्या शेजारी राहणारी मिराबाई राठोड हिने फिर्यादी यांच्या मुलीच्या घरासमोर सांडपाणी टाकले. याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता, त्यावेळी मीराबाई राठोड हिने चिडून फिर्यादी यांना काठीने व फिर्यादी यांच्या मुलीस हाताने मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.