Crypto Currency मधून कमाई करण्याची इच्छा असेल तर हे वृत्त तुमच्यासाठीच आहे. क्रिप्टो करन्सी हे एक आभासी चलन आहे. क्रिप्टोच्या दुनियेत सर्वाधिक मजूबत चलन म्हणजे बिटकॉईन हे आहे. एका बिटकॉईनची किंमत जवळपास 1 लाख रुपये आहे. इच्छा असूनही अनेकांना हे चलन काही खरेदी करता येत नाही. तर मुकेश अंबानी यांचे जिओ कॉईन पण बाजारात धमाका करण्याची शक्यता आहे. पण कोणते चलन तुमच्या फायद्याचे ठरेल?
काय आहे बिटकॉईन?
बिटकॉईन हे एक आभासी चलन आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून हे चलन सातत्याने उसळी घेत आहे. 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. तेव्हापासून या चलनाने मोठी झेप घेतली आहे. बिटकॉईन हे क्रिप्टो जगतातील सर्वात मजबूत चलन आहे. भारतीय चलनात 1 BTC ची किंमत ₹91,05,605.47 इतकी आहे.
हे सुद्धा वाचा
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे मोठी रक्कम आवश्यक आहे. जितक्या झटपट हे चलन आगेकूच करते. त्याहून अधिक त्यात घसरण होते. याशिवाय यावर 30 टक्के कर आणि 4 टक्के सेस, 1 टक्के TDS पण द्यावा लागतो. तुमच्या कमाईतील 35 टक्के रक्कम ही कर रुपात खर्च होते.
जिओ कॉईन आहे तरी काय?
जिओ कॉईन मुकेश अंबानी ही संभाव्य क्रिप्टो कॉईन आहे. आशियातील दिग्गज व्यावसायिक मुकेश अंबानी लवकरच JioCoin सह बाजारात एंट्री घेतील. अर्थात हे संभाव्य चलन आहे. काही जिओ प्लॅटफॉर्म्सवर जिओ कॉईन दिसत आहे. जिओ कॉईन बिट कॉईनच्या तुलनेत अत्यंत स्वस्त असतील. काही वृत्तानुसार, जिओ कॉईन ग्राहकांना मोफत देण्यात येईल. अजून त्याची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.
काय होईल फायदा?
जिथे बिटकॉईन महागडी गुंतवणूक आहे. तिथे जिओ कॉईन स्वस्त असेल. काहींच्या मते जिओ ग्राहकांसाठी हे कॉईन मोफत देण्याची चर्चा होत आहे. याशिवाय ग्राहक Jiosphere ब्राऊझरचा वापर करून हळूहळू रिवार्ड्स रुपात जिओ कॉईन मोफत कमावता येईल.
Disclaimer : बिटकॉईन अथवा क्रिप्टोकरन्सीचे फायदे आणि तोटे आहे. जर तुम्हाला यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर वित्तीय सल्लागाराची मदत घ्या. बाजाराचा अभ्यास करा. ही याबाबतची घडामोड आहे.