Published on
:
18 Nov 2024, 1:00 am
Updated on
:
18 Nov 2024, 1:00 am
रत्नागिरी ः जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी खुषखबर आहे. रत्नागिरीत होणार्या आशिया खंडातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या नोकर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. पहिल्या टप्प्यात 500 जणांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.
मंत्री उदय सामंत यांनी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात विविध विकासकामांवर भर दिला. उद्योगमंत्री असताना अनेक उद्योगांना चालना देण्याचे काम त्यांनी केले आहे. तसेच नवनवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केला. रत्नागिरी येथे आशिया खंडातील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प आणला. आता या प्रकल्पाची मुहूर्तमेढ अखेर रोवली गेली आहे. नोकरभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
पहिल्या टप्प्यात 500 तरुणांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी कंपनीने जाहिरात देखील काढली आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत दीड हजार तरुणांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. एक प्रकारे त्यांना दिलासा मिळाला आहे.