झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू, 528 उमेदवारांचे भविष्य ठरणार

1 day ago 1

झारखंडमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. विधानसभेच्या 81 पैकी 38 जागांसाठी मतदान सुरू आहे. 14,218 मतदान केंद्रांवर आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. यापैकी 31 मतदान केंद्रांवर दुपारी 4 वाजता मतदान संपेल तर उर्वरीत मतदान केंद्रावर 5 वाजेपर्यंत मतदान होईल.

या विधानसभेत सत्ताधारी जेएमएमच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यांच्यात चुरशीची लढत आहे. दुसऱ्या टप्प्यात 528 उमेदवारांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे.

एकूण मतदार किती?

दुसऱ्या टप्प्यात 60.79 लाख महिलांसह एकूण 1.23 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. येथे एकूण 528 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 472 पुरुष, 55 महिला आणि एक ट्रान्सजेंडर आहे.

दरम्यान, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे 200 कोटी रुपयांचे अवैध साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाशी संबंधित 90 प्रकरणे नोंदवण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी के रवी कुमार यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article