खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला.
Published on
:
02 Feb 2025, 2:55 pm
Updated on
:
02 Feb 2025, 2:55 pm
नवी दिल्ली : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी (दि.२) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला. त्रिनगर विधानसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ संवाद दौरा केला. या मतदारसंघात भाजपचे तिलक राम गुप्ता हे उमेदवार आहेत. उदयनराजे भोसले यांच्यासह स्थानिक उमेदवार तिलक राम गुप्ता देखील उपस्थित होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेले भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दरम्यान, मराठी मतदारांशी संवाद साधण्यासाठी भाजपाने मराठी नेत्यांना प्रचारात उतरवले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील प्रचारात सहभाग घेतला. माजी केंद्रीय मंत्री, खा. डॉ. भागवत कराड हे देखील पूर्णवेळ दिल्लीत प्रचार करत आहेत.