दिव्य मराठी अपडेट्स:पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा

1 hour ago 1
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा मुंबई - ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे आज जालना जिल्ह्याच्या‎दौऱ्यावर, शेतकरी मेळाव्यास उपस्थिती‎ जालना - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी (10‎‎ऑक्टोबर) जिल्ह्याच्या‎‎दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती‎‎ संभाजीनगर येथून हेलिकॉप्टरने‎‎ दुपारी 2.25 वाजता आरगडे गव्हाण येथील हेलिपॅड (ता. घनसावंगी)‎‎ येथे त्यांचे आगमन होईल. मोटारीने‎‎ कुंभार ‍पिंपळगावकडे प्रयाण ‎करतील. दुपारी 2.30 वाजता फूड प्रोसेसिंग युनिट-2 चे‎भूमि पूजन करून शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील.‎ जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह‎पोस्ट, िजंतूर पोलिसांत गुन्हा दाखल‎ जिंतूर - मनोज जरांगे पाटील यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट ‎केल्याने, अज्ञाताविरुद्ध पोलिसात 8 रात्री उशिरा‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा हा‎ प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण‎ होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पोलिसांनी तातडीने‎ दखल घेतली. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष‎ बाळासाहेब काजळे यांच्या फिर्यादीवरून, अज्ञात ‎आरोपीविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाख ल‎करण्यात आला आहे.‎ भाजपचे माजी खासदार काकडेही शरद पवारांकडे मुंबई - विधानसभेच्या तोंडावर महायुतीतून जोरदार आऊटगोईंग सुरू झाले आहे. भाजपचे माजी खासदार, प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडेही शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत. 2019 च्या विधानसभेपूर्वी राष्ट्रवादीची जशी अवस्था होती तशी आता भाजपची होत आहे. दोन महिन्यांपूर्वी काकडे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी पक्षांतराचा इन्कार केला होता. परंतु, मला भाजपकडून कोणतीही विचारणार होत नाही. पक्षाचे काय सुरू आहे, हे मला माहिती नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याचवेळी ते भाजपमधून बाहेर पडतील, असे संकेत होते. या पूर्वी हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे या भाजपच्या नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार गटाचे माजी उपसभापती रामराजे निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाणही 14 तारखेला तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. लोकसभेदरम्यान अमोल कोल्हे, निलेश लंके, बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांची साथ सोडली होती. बीडला राज्यपालांना काळे झेंडे‎दाखवण्यापूर्वी 4 महिला ताब्यात‎ बीड‎ - राज्यातील महिला अत्याचारातील आरोपींना फाशीची‎शिक्षा द्यावी या मागणीसाठी राज्यपालांना निवेदन‎देण्यापासून पोलिसांनी रोखल्याने, महिलांनी घोषणा दिल्या.‎4 महिलांना ताब्यात घेत थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यात‎नेले. या महिला राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार होत्या.‎ तसेच बीडच्या रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब‎आंबेडकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी मोर्चा काढण्याचे‎निवेदन देणाऱ्या 10 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले,‎तर 10 जणांना नजरकैदेत ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद‎पवार गटाच्या नेत्या ॲड. हेमा पिंपळे यांच्यासह 4 महिला,‎बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन‎राज्यपालांना देणार होत्या. त्यांच्याकडे पास नसल्याने‎पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले होते.‎ अयोध्येत लागणार 28 लाख दिवे, 5 टन फुलांनी सजणार राम मंदिर अयोध्या - अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरची पहिली दिवाळी भव्यदिव्य करण्याची तयारी सुरू आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी शरयू नदीच्या 55 ​​घाटांवर 28 लाखांहून अधिक दिवे लावण्यात येणार आहेत. यासाठी 30 हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंसेवक काम करणार आहेत. राम मंदिर 5 टन फुलांनी सजवण्यात येणार आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, मंदिर व परिसरात 2 लाख दिवे लावले जातील. मंदिर परिसरात चिनी बनावटीचे दिवे किंवा झुंबर वापरले जाणार नाहीत. राम की पौडीच्या सर्व घाटांवर 16 बाय 16 ब्लॉकमध्ये 30 मिलिलिटर क्षमतेच्या दिव्यांमध्ये 30 मिलिलिटर मोहरीचे तेल टाकले जाईल.’ नेपाळी नोटा छापणार चीन, यावर वादग्रस्त नकाशाही काठमांडू - नेपाळच्या नव्या नोटा चीनची कंपनी छापणार आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने 3000 कोटींच्या नोटा वादग्रस्त नकाशासह छापण्याचे कंत्राट चायना बँक नोट प्रिंटिंग अँड प्रिंंटिंग कॉर्पोरेशनला दिले. नकाशात उत्तराखंडच्या लिपुलेक आणि लिंपियाधुराला आपला भाग दाखवले आहे. महिला टी-20 वर्ल्डकप : भारताचा मोठा विजय दुबई - महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत बुधवारी भारताने श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 3 गडी गमावत 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19.5 षटकांत 90 धावांत सर्वबाद झाला. आता भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article