इस्लामपूर : दै. पुढारीच्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी तहसीलदार सचिन पाटील, पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, खंडेराव जाधव, रूपाली जाधव, गिरीश चितळे, संगीता शिंदे, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार.
Published on
:
08 Feb 2025, 12:38 am
Updated on
:
08 Feb 2025, 12:38 am
इस्लामपूर : इस्लामपूरसह परिसरातील नागरिकांसाठी खरेदी, खाद्य, मनोरंजनाचा आनंदोत्सव असलेल्या दै. पुढारी कस्तुरी क्लब आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलला शुक्रवारपासून मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. तहसीलदार सचिन पाटील यांच्याहस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. पोलिस निरीक्षक संजय हारुगडे प्रमुख पाहुणे होते. प्रतिराज युथ फौंडेशन अध्यक्ष, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, रूपाली जाधव, चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे, प्राजक्ता पार्लरच्या संगीता शिंदे, दै. पुढारीचे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार प्रमुख उपस्थित होते.
पाच दिवस चालणारा हा फेस्टिव्हल इस्लामपूरसह परिसरातील नागरिकांसाठी खाद्य, खरेदी, मनोरंजनाची धमाल आहे. प्रतिराज युथ फौंडेशन प्रायोजक व सहयोगी प्रायोजक चितळे श्रीखंड, प्राजक्ता ब्युटीपार्लर हे सहप्रायोजक आहेत. फेस्टिव्हलमध्ये 130 हून अधिक स्टॉल्समध्ये चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, होम डेकोर, गारमेंट्स, फर्निचर, सौंदर्यप्रसाधने, किचन ट्रॉली, मसाले, लोणची, दागिने, बॅग्ज आणि प्लास्टिक वस्तूंची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र दालन आहे. ग्राहकांना वाहनांची माहिती, टेस्ट ड्राइव्हची संधी आणि स्पॉट बुकिंगवर भरघोस सूट मिळणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल आहे. झणझणीत कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मटण व चिकन दम बिर्याणीचा स्टॉल आहे. विविध प्रकारचे मासे, चिकन, मटण यांच्या वेगवेगळ्या चविष्ट डिशेस, चौपाटीचे प्रसिद्ध पदार्थ, साऊथ इंडियन डिशेस, बर्गर, सँडविच आदी फास्टफूड आणि अशाच वैविध्यपूर्ण स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल आहेत.
शुक्रवारी सायंकाळी कला अकॅडमी, नुपूर कथ्थक अकॅडमीच्या कलाकारांनी गणेशवंदनेच्या गाण्यावर नृत्य सादर करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर क्लब सेव्हन्थ कलर्स ग्रुपच्या कलाकारांनी लोकप्रिय हिंदी - मराठी गाणी सादर केली. रश्मी सावंत या निवेदिका होत्या. कस्तुरी खंडेराव जाधव, श्रावणी खंडेराव जाधव, प्राजक्ता शिंदे, अॅड. सुजाता कुलकर्णी, माजी नगरसेवक आयुब हवलदार, सागर जाधव, विजय देसाई, अंकुश जाधव, उमेश रासनकर आदी उपस्थित होते.
आज ‘पारू’ मालिकेतील कलाकार फेस्टिव्हलमध्ये...
आज (शनिवारी) सायंकाळी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय सिरीयल पारूमधील कलाकार फूड फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिरीयलमधील श्वेता खरात (अनुष्का) आणि पूर्वा शिंदे (दिशा) हे कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. इस्लामपूर येथील हेमंत रकटे व कलाविश्व डान्स अॅकॅडमी प्रस्तुत हॉलीवूड-बॉलीवूड डान्स शो होणार आहे.